शिवसेना- भाजप पुन्हा युती करणार? संजय राऊतांनी केला मोठा खुलासा

शिवसेना- भाजप पुन्हा युती करणार? संजय राऊतांनी केला मोठा खुलासा

मुंबईः   शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी मुंबईत बीकेसीमधील सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट झाली.  शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास उभय नेत्यांमध्ये ही भेट झाली. या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. तसंच अनेक चर्चांही रंगू लागल्या. त्यात शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा युती करणार का? असा सवाल उपस्थित होऊ लागला. त्यावर संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे. 

भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार नाही. चर्चा करायची असेल तर ती होऊ शकते. आपल्याकडे चर्चेला काही सेन्सॉरशिप नाही. पण चर्चेला रेशनिंग सुद्धा नाही, या शब्दात राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 

म्हणून संजय राऊत भेटले फडणवीसांना 

सामनाच्या मुलाखतीसंदर्भात फडणवीसांची भेट घेतल्याचं सांगत ही भेट गुप्त नव्हती, असं राऊतांनी स्पष्ट केलं आहे.  सामनाच्या मुलाखतीसाठी देवेंद्र फडणीस यांना बऱ्याच दिवसांपासून भेटण्याचा विचार होता. शनिवारी आम्ही भेटल्यानंतर गप्पा मारल्या त्यानंतर आम्ही एकत्र जेवण केले, असंही त्यांनी सांगितलं. 

आमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही. फडणवीस यांची भेट ही गुप्तपणे मुळीच नव्हती.  मुळात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कुणीही कुणाचे शत्रू नाही.  आमच्या या भेटीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना होती, असंही राऊत म्हणालेत. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेण्याचा विचार होता. पण कोरोनाच्या काळामुळे शक्य झाली नाही, असेही राऊत म्हणाले.

तसंच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. उद्धव टाकरेही मोदींना आपला नेता मानतात आणि मी सुद्धा त्यांन मानतो, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे. 

मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणं काय अपराध आहे का? देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. राज्यातील दोन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी भेटणं म्हणजे अपराध नाही आहे. मुळात ती गुप्त भेट नव्हती, जाहीरपणे आम्ही भेटलो.  दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते भेटू शकतात. चर्चा करू शकतात. शरद पवार यांची मुलाखत घेतली होती, तेव्हाच आपण देवेंद्र फडणवीस, राहुल गांधी आणि अमित शाह यांचीही मुलाखत घेणार असल्याचं जाहीर केलं होतं, असंही संजय राऊत यांना सांगितलं.

Shiv Sena-BJP will form an alliance again Sanjay Raut made a big revelation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com