esakal | 'शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष'! लोकसभेत आणि राज्यसभेत एकाच विधेयकावर वेगवेगळी भूमिका घेतल्याचा विरोधकांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

'शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष'! लोकसभेत आणि राज्यसभेत एकाच विधेयकावर वेगवेगळी भूमिका घेतल्याचा विरोधकांचा आरोप

निलेश राणेंनी शिवसेनेला सवाल केला आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही शिवसेनेच्या भूमिकेवर सडकून टीका केली होती.

'शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष'! लोकसभेत आणि राज्यसभेत एकाच विधेयकावर वेगवेगळी भूमिका घेतल्याचा विरोधकांचा आरोप

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - संसदेत पारित झालेल्या कृषी विधेयकावर शिवसेनेच्या भूमिकेवर भाजपनेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. शिवसेनेने लोकसभेत आणि राज्यसभेत एकाच विधेयकाबाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे निलेश राणेंनी शिवसेनेला सवाल केला आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही शिवसेनेच्या भूमिकेवर सडकून टीका केली होती.

कृषी सुधारणा विधेयकावर संसदेत गोंधळ पाहायला मिळाला होता. कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांनी या विधेयकाला विरोध केल्याचे पाहायला मिळाले. परंतु शिवसेनेच्या वेगवेगळ्या भूमिकेवर निलेश राणे म्हणतात की, आधी नागरिकत्व सुधारणा विधेयक, आणि नतंर कृषी सुधारणा विधेयक, दोन्ही वेळेला लोकसभेत समर्थन आणि राज्यसभेत विरोध करण्याच कारण काय? असा सवाल त्यांनी विचारला. शिवसेनेनेच्या नेत्यांमध्ये एकमत नाही का? लोकसभेतील शिवसेना नेते संजय राऊतांना नेता मानत नाही. असं बोलत राणेनी संजय राऊतांवरही निशाना साधला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी देखील ट्वीट करीत म्हटले आहे की. शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे. लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेतात. आमच्यासोबत सुद्धा जेव्हा सत्तेत होते, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका त्यांनी घेतल्या. त्यांना आधी भूमिका घ्यावी लागेल. शेतीसंदर्भात तर शिवसेनेने कधीच भूमिका घेतली नाही

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही कृषी विधेयकाबाबत आज शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या संसदेतील भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. भाजपशी लढणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी विधेयकाला पाठिंबा का दिला?,  असा सवाल वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही विचारला.