शिवसेना ग्रामपंचायत निवडणूका स्वबळावर लढवणार; उद्धव ठाकरेंची संपर्क प्रमुखांशी बैठक

शिवसेना ग्रामपंचायत निवडणूका स्वबळावर लढवणार; उद्धव ठाकरेंची संपर्क प्रमुखांशी बैठक


मुंबई : महाविकास आघाडीने विधानपरीषदेचे निवडणुकीत खणखणीत यश मिळवल्यानंतर आगामी ग्रामपंचायत निवडणुकाही तीन्ही पक्ष सोबत लढण्याची शक्यता वर्तवली जात होती.मात्र, शिवसेनेने या निवडणुकीत सर्व जागा लढण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि उपनेत्यांची बैठक घेतली.

जानेवारी महिन्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.ग्राम पंचायतीच्या निवडणुका हा शक्यतो पक्षविरहीत असतात.त्यात उमेदवार पक्षभेद विसरुन पॅनल,गट तयार करुनही निवडणुक लढवली जाते.मात्र,शिवसेना सर्व जागांवर उमेदवार देऊन गरज पडल्यास स्वतंत्र पॅनल तयार करुन निवडणुक लढण्याची शक्यता आहे.

उध्दव ठाकरे यांनी आज पक्षाचे जिल्ह्यातील संपर्क प्रमुख आणि उपनेत्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.त्याच बरोबर सरकारी योजना घरा घरात पोहचविण्याचे आदेशही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.या बैठकीला विधानपरीषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे,खासदार अनिल देसाई उपस्थीत होते.

Shiv Sena to contest Gram Panchayat elections on its own Uddhav Thackerays meeting with samaprk pramukh

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com