शिवसेनेचा भाजपला 'दे धक्का', राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे गटाला दिली साथ

Ambarnath Nagar Parishad : अंबरनाथ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी लढतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीच्या सदाशिव पाटील यांनी बाजी मारली. स्पष्ट बहुमत नसल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती.
Shiv Sena And NCP Alliance Clinch Victory In Ambarnath

Shiv Sena And NCP Alliance Clinch Victory In Ambarnath

Esakal

Updated on

अंबरनाथ, ता. १२ (वार्ताहर) : गेल्या पंधरा दिवसांपासून तापलेले अंबरनाथचे राजकारण अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचले असून भाजपला शिंदे गटाने जोरदार धक्का दिला आहे. शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे सदाशिव पाटील उपनगराध्यक्षपदी निवडून आले असून नगर परिषदेवर शिवसेना (शिंदे गटाने) पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवण्यात शिवसेनेला यश आल्याने नगर परिषदेत युतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com