शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवतिर्थावर नाही

पूजा विचारे
Thursday, 22 October 2020

 शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होणार आहे. पहिल्यांदाच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावर होणार नाही आहे. १०० जणांच्या उपस्थितीत मेळावा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मुंबईः  शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होणार आहे. पहिल्यांदाच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावर होणार नाही आहे. १०० जणांच्या उपस्थितीत मेळावा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच वाहिन्यांच्या माध्यमातून मेळावा देशभरात पोहोचणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव  ठाकरे यांचा हा मुख्यमंत्री म्हणून पहिलाच मेळावा असेल.

कोरोनाचं संकट पाहता शिवसेनेनं हा निर्णय घेतला आहे. शिवतिर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर हा मेळावा घेण्याची प्रथा आहे. ही प्रथेत पहिल्यांदा खंड पडणार आहे. 

अधिक वाचा-  राज्य सरकारच्या परवानगीनंतरच CBIला तपास करता येणार, गृहमंत्र्यांची माहिती

कोरोनाचे निर्बंध आणि पावसाची शक्यता असल्यानं सावरकर स्मारकात मेळावा घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. सावरकर स्मारकात व्यासपीठ उभारुन ठाकरे यांचे भाषण लाईव्ह प्रक्षेपित केले जाईल, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.

अधिक वाचा-  लिलावती रुग्णालयातून अमित ठाकरेंना डिस्चार्ज
 

Shiv Sena Dussehra rally is not at Shivaji Park this year uddhav thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena Dussehra rally is not at Shivaji Park this year uddhav thackeray