'संजय राऊत मुंगेरीलाल' तर, 'आशिष शेलार मार्केट संपलेला माणूस'; वाक् युद्ध रंगले

टीम ई-सकाळ
Friday, 15 November 2019

एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत म्हणाले, 'आशिष शेलार हा मार्केट संपलेला माणूस आहे.'

मुंबई  : शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यातील वाक् युद्ध सध्या राज्यात चर्चेचा विषय बनले आहे. निवडणूक निकालानंतर संजय राऊत यांनी सातत्याने भाजप आणि भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर आता भाजप नेते राऊत यांना टार्गेट करू लागले आहेत. राऊत यांनी भाजप नेते आशिष शेला र यांना जोरदार टोला लगावलाय. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

फडणवीसांना अहंकार नडला; भाजपच्या नेत्याचं खुलं पत्र

संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल होते. त्यावेळी आशिष शेलार यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर 'राऊत यांनी कमी बोलावे, अशी आमची इच्छा आहे,' असा टोला शेलार यांनी लगावला होता. तर, आज 25 वर्षे मुख्यमंत्री शिवसेनेचाच असले, या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर शेलार यांनी भाष्य केले होते. शेलार म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना समजून घेण्यासाठी राऊत यांना 25 वर्षे लागतील. राऊत यांची रोजची पत्रकार परिषद म्हणजे वगनाट्य आहे. त्यांच्यामुळेच मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात विसंवाद निर्माण झाला.'

मुख्यमंत्रिपद पाच वर्षे शिवसेनेला मग, आघाडीकडे काय?

शेलार यांच्या टीकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राऊत म्हणाले, 'आशिष शेलार हा मार्केट संपलेला माणूस आहे.' दरम्यान, राऊत यांच्या दाव्याची भाजप नेत्यांकडून खिल्ली उडवण्यात येत आहे. भाजप नेत्या विजया रहाटकर यांनीही ट्विटरवरून राऊत यांना लक्ष्य केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena leader sanjay raut reaction on bjp leader ashish shelar statement