esakal | 'आदित्यसाहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हा!'; शिवसेना आमदारांचा आग्रह
sakal

बोलून बातमी शोधा

shiv sena mla insist aaditya thackeray for cm post matoshree meeting

आदित्यसाहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हा’,असा आग्रह शिवसेना आमदारांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना केला आहे. मुंबईतील बैठकीत या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती शिवसेना आमदारांनीच दिली.

'आदित्यसाहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हा!'; शिवसेना आमदारांचा आग्रह

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘आता हीच वेळ आहे. आदित्यसाहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हा’,असा आग्रह शिवसेना आमदारांनी उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना केला. आज मातोश्री वर नवनिर्वाचित शिवसेना आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी सर्व आमदारांचे उध्दव ठाकरे यांनी स्वागत केले तर सर्व आमदारांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले. आमदारांच्या भावना तीव्र असल्या तरी उध्दव ठाकरे यांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे.

बारामतीतच ठरणार राज्याच्या राजकारणाची दिशा

लोकसभेच्या वेळी भाजप अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत युतीचा फिफ्टी फिफ्टी फार्म्युला ठरलेला आहे. अडीवर्षे मुख्यमंत्री पदासोहतच सत्तेतला अर्धा वाटा यावर युतीचे शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सोबत सरकार स्थापन करताना युतीचे हे सुत्र अंमलात येईल, असा विश्वास उध्दव ठाकरे यांनी केला. या बैठकीनंतर बोलताना आमदार प्रताप सरनाईक व भास्कर जाधव यांनी या बैठकीत सत्ता स्थापन करण्याचे सर्वाधिकार उध्दव ठाकरे यांना दिल्याचे स्पष्ट केले. भाजप सोबतच सत्ता स्थापन करण्याचा मानस असून युतीच्या फार्म्युल्यावरच ही सत्ता यावी असेही या दोन्ही आमदारांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळात समावेश होणारे भाजप नेते सावध

नवे समीकरण उदयाला येणार?
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना असे नवे समीकरण राज्यात उदयाला येणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात काँग्रेस थोडी सकारात्मक असली तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमचा तसा काही विचार नाही, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. आज बारामती येथे पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे असं नवं समीकरण उदयाला येणारी की, महायुतीच पुन्हा सत्तेत येणार याविषयी राज्यात उस्तुकता वाढली आहे.

loading image