कंगना राणावतच्या निषेधाचा ठराव विधानसभेत करावा, शिवसेना आमदाराची मागणी

संजय मिस्किन
Monday, 7 September 2020

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची बदनामी केल्या प्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतवर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहे.  

मुंबई:  शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची बदनामी केल्या प्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतवर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहे.  सध्या विधानसभा उपाध्यक्ष उपस्थित असल्यामुळे त्यांच्याकडे हे पत्र देण्यात आले. या पत्रात कंगना राणावतवर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात विधानसभेत एकमताने ठराव पारीत करावा अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रात केली आहे.  त्यांच्या या मागणी करणाऱ्या पत्रावर तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करावा असे आदेश विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेत.

महाराष्ट्राची आणि मुंबईची बदनामी करणाऱ्या कंगना राणावतवर गुन्हा दाखल करा, अशी मागणीही सरनाईक यांनी केली आहे.  कंगनानं मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत कारवाई करावी, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केलीय. या पत्रात त्यांनी सुशांत सिंह प्रकरणातील ड्रग्ज प्रकरणाचाही तपास करण्याची मागणी केली आहे.

त्यांनी पत्रात लिहिलं की, कंगना राणावतनं मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना तालिबान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरशी करत असेल तर निश्चितपणे ते चुकीचं आहे. याबाबत मी विधानसभा अध्यक्षांना पत्रही दिलं होतं. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात देखील अनेक ड्रग्जचे धागेदोरे समोर येत आहेत. कंगनाने अनेक फिल्म स्टारवर ड्रग्जचे आरोप केलेत आणि त्या फिल्स स्टारने देखील कंगना ड्रग्जच्या आहारी गेल्याचे आरोप केले होते. त्यामुळे मी या सर्व प्रकरणाची चौकशी करावी. 

अधिक वाचाः  'त्या' इशाऱ्यानंतर अदानी ग्रुपचे शिष्ठमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला; वाढीव वीजबिलांबाबत चर्चा

विधानभवन परिसरात सावळा-गोंधळ

कोरोनाच्या भयानक सावटाखाली आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवात झाली. मात्र विधानभवन परिसरात अक्षरक्षः सावळा गोंधळ सुरू असल्याचे चित्र होते.  विद्यमान आमदारांनाही विधानभवनात प्रवेशासाठी ससेहोलपट करावी लागत होती.

हेही वाचाः  मुख्यमंत्र्यांनंतर 'या' बड्या नेत्यांच्या घरी खणखणले धमकीचे फोन, वाचा सविस्तर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दोन दिवसांच्या अधिवेशनासाठी निकराची दक्षता घेण्यात आली आहे. विधानभवात प्रवेश करणार्या प्रत्येक आमदार, कर्मचारी , अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. मागील दोन दिवस विधानभवन प्रशासनाने या चाचण्या घेतल्या. मात्र आज अधिवेशन सुरू होण्याच्या वेळेपर्यंत त्यांचे अहवाल आले नसल्यानं एकच गोंधळ उडाला.

(संपादनः पूजा विचारे) 

Shiv Sena MLA Pratap Sarnaik Wrote letter assembly speaker Against kangana ranaut


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena MLA Pratap Sarnaik Wrote letter assembly speaker Against kangana ranaut