esakal | खडाजंगी सुरूच ! योगी आदित्यनाथांच्या आरोपावर शिवसेनेनं दिलं 'असं' उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

खडाजंगी सुरूच ! योगी आदित्यनाथांच्या आरोपावर शिवसेनेनं दिलं 'असं' उत्तर

उद्धव ठाकरेंना या वर्तणुकीबद्दल माणुसकी कधीही क्षमा करणार नाही, अशा आशयाचं ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. यावर आता शिवसेनेनं व्हिडिओच्या माध्यमातून योगी आदित्यनाथ यांना प्रत्त्युतर दिलं आहे. 

खडाजंगी सुरूच ! योगी आदित्यनाथांच्या आरोपावर शिवसेनेनं दिलं 'असं' उत्तर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई- लॉकडाऊनच्या काळात अनेक मजूर आपआपल्या राज्यात परतलेत. या मजुरांवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या चांगलंच राजकारण रंगल्याचं चित्र दिसतंय. घाम गाळून महाराष्ट्र उभा करणाऱ्या मजुरांना शिवसेना-काँग्रेस सरकारने फसवलं आहे. लॉकडाऊन काळात मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी भाग पाडण्यात आलं. यासाठी उद्धव ठाकरेंना या वर्तणुकीबद्दल माणुसकी कधीही क्षमा करणार नाही, अशा आशयाचं ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. यावर आता शिवसेनेनं व्हिडिओच्या माध्यमातून योगी आदित्यनाथ यांना प्रत्त्युतर दिलं आहे. 

बेरोजगारांनी घराचे भाडे कसे द्यायचे? उपासमारीमुळे परप्रांतीयांच्या वस्त्या ओस

वसेनेचं अधिकृत ट्विटर अकाऊंट शिवसेना कम्युनिकेशन यावर एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. यावर योगी जी, जरा सुन और देख लीजिए,  असं कॅप्शन देत हा व्हिडिओ माय योगी ऑफिसला टॅग केला आहे. 

या व्हिडिओत उत्तर प्रदेशमध्ये पोहोचलेल्या मजुरांनी खरी हकीकत सांगितली आहे. मजुरांनी या व्हिडिओत स्पष्ट सांगितलं आहे की, महाराष्ट्रात खाण्या-पिण्याची व्यवस्थित सोय होत होती. येथे 50- 50 किलोमीटरपर्यंत लोकांच्या रांगा लागल्या आहेत. पण येथे साधी पिण्याच्या पाण्याचीही सोय केली नाही आहे. महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी होती. तिथे मजुरांसाठी चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. 

योगींचा संजय राऊतांना टोला 

संजय राऊतजी, भुकेलेला मुलगा फक्त आपल्या आईला शोधतो. महाराष्ट्र सरकारने अगदी सावत्र आई म्हणून पाठिंबा दर्शवला असता, तरी महाराष्ट्राला हातभार लावणाऱ्या उत्तर प्रदेशच्या रहिवाशांना मूळगावी परत यावे लागले नसते, असं योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करुन संजय राऊतांना टोला लगावला आहे. 

अरे चाललंय काय? कोरोनाग्रस्त गर्भवती महिला 6 तास रुग्णवाहिकेच्या प्रतिक्षेत; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
 
रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. कोरोनाला रोखण्यासाठी सरकार काय काय उपाययोजना करत असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी काय काय उपाययोजना करण्यात आल्या ते देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. परप्रांतीय मजुरांना आश्रय द्यायला राज्य सरकार नेहमी तयार होतं, मात्र कामगारांनी घरी जायचं मनाशी पक्क केलं होतं. या मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी राज्य सरकार रेल्वे, एसटी गाड्यांची सोय करत असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

loading image