esakal | अडीच वर्षांचा प्रस्ताव असेल, तरच बोला; शिवसेना आक्रमकच
sakal

बोलून बातमी शोधा

shiv sena spokesperson sanjay raut statement about cm devendra fadnavis

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली होती. त्यानुसारच सगळं व्हायला हवं, असा संजय राऊत यांनी आज पुनरुच्चार केला.

अडीच वर्षांचा प्रस्ताव असेल, तरच बोला; शिवसेना आक्रमकच

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा गुंता निर्माण झाला असताना आज, शिवसेनेने अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. शिवसेनेचा प्रवक्ते संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. तसेच बहूमत असेल तोच मुख्यमंत्री होईल, असे सांगून चेंडून पुन्हा भाजपच्या कोर्टात ढकलला आहे.

राज्यात 1995, 2014मध्ये कसे झाले होते खाते वाटप?

राष्ट्रपती राजवटीच्या आड राजकारण
आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या काळजीवाहून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. सरकारची मुदत संपत असल्यामुळं राज्यात नवं सरकार स्थापन नाही झालं तर, राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना, भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'राष्ट्रपती राजवटीच्या आड राजकारण करण्याचा डाव सुरू आहे. काळजी वाहू मुख्यमंत्री होऊन राज्याची सुत्रे हलविण्याचा त्यांचा डाव आहे आणि हा संविधानाचा, कायद्याचा अपमान आहे. त्यांनी महाजनादेश म्हटलं होतं. पण, त्यांना महाजनादेश मिळालेला नाही, हे स्पष्ट आहे. त्यांना हंगामी मुख्यमंत्री होऊन सूत्रं हलवायची आहेत. मुळात महाराष्ट्राला अशा काळजीवाहू सरकारची गरज नाही. फडणवीस यांना नियमानुसार राजीनामा द्यावाच लागेल.' शिवसेना सरकार का स्थापन करत नाही, या प्रश्नावर राऊत म्हणाले, 'राज्यापांवर सगळं अवलंबून. सर्वांत मोठ्या पक्षालाच सरकार स्थापन करण्याची पहिली संधी मिळते. या राज्याचा मुख्यमंत्री तोच असेल ज्याच्याकडं बहुमत असेल.'

पुण्यात उघडला, मुंबई, ठाण्यात बसरसला (व्हिडिओ)

म्हणून अमित शहांचा हस्तक्षेप नाही
लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली होती. त्यानुसारच सगळं व्हायला हवं, असा राऊत यांनी आज पुनरुच्चार केला. ते म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीवेळी दोन्ही पक्षांमध्ये यावर चर्चा झाली आहे. त्यावेळी भाजप अध्यक्ष अमित शहा देखील उपस्थित होते. त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. म्हणूनच ते सध्या या विषयात हस्तक्षेप करत नसल्याचं दिसत आहे.'