डोंबिवलीत आज पेट्रोल फक्त एक रुपया लीटर

पेट्रोल
पेट्रोल

शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज (13 जून) वाढदिवस आहे. ठाकरे कुटुंबातूनच राजकारणाचा वारसा मिळालेल्या आदित्य ठाकरे यांनी कायमच सर्वांचं लक्ष वेधलं. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत युवासेनेतर्फे एक रुपया लीटर दरानं पेट्रोलची विक्री होणार आहे. डोंबिवली एमआयडीसी येथील उस्मा पेट्रोल पंपवर पेट्रोल अवघ्या एक रुपयात एक लीटर या दराने विकलं जाणार आहे. याबाबतचं एक पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. राज्यभरात प्रेट्रोलच्या दरानं शंभरी पार केली आहे. पुढील काही दिवसांत डिझेलही शंभर रुपयांच्या पुढे जाईल असं चित्र आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल परवडेनासं झालं आहे. मुंबईत आणि उपनगरांमध्ये सध्या पेट्रोल प्रति लीटर 102 रुपये दरानं मिळते. या दरवाढीपासून दिलासा देण्याचा प्रयत्न युवासेनेनं केला आहे.

पेट्रोल
HIV+ महिलेच्या शरिरात 216 दिवस कोरोना; 32 वेळा झाला म्युटेट

कल्याण युवासेना विधानसभा अधिकारी योगेश म्हात्रे आणि नगरसेविका पूजा म्हात्रे यांनी डोंबिवलीत एक रुपया प्रति लीटर या दरानं पेट्रोल देत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 13 जून रोजी सकाळी 10 ते 12 यादरम्यान डोंबिवली एमआयडीसी येथील उस्मा पेट्रोल पंपवर युवासेनेकडून अवघ्या एक रुपयात पेट्रोल एक लीटर दिलं जाणार आहे.

पेट्रोल
मुंबई-दिल्लीमध्ये तिसरी लाट नाही, तज्ज्ञांनी सांगितलं कारण

अंबरनाथ येथील युवासेनेच्या पदाधिकार्यांनीही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिसानिमित्त पेट्रोल कमी दरानं विकून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. अंबरनाथ पश्चिमेकडील येथील विमको नाक्यावरील पेट्रोल पंपावर सकाळी 11 ते दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास येणाऱ्या वाहनचालकासाठी 50 रुपये लीटरने पेट्रोल देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com