Vidhansabha Election : शिवसेने तर्फे (उद्धव ठाकरे गट)वसई मधून सुनील शिंदे आणि नालासोपारा मधून विनायक राऊत यांना उमेदवारी देण्याची मागणी

राज्यात अडीच महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वसई तालुक्यातील वसई, नालासोपारा व बोईसर या तीन विधानसभेच्या जागा महाविकास आघाडी मधील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहेत.
Vidhansabha Election
Vidhansabha Election sakal
Updated on

विरार ता.(संदीप पंडित)

राज्यात अडीच महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वसई तालुक्यातील वसई, नालासोपारा व बोईसर या तीन विधानसभेच्या जागा महाविकास आघाडी मधील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहेत. पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीत वसई व नालासोपारा या दोन विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार सुनिल शिंदे व नालासोपारा विधानसभा मतदार संघात शिवसेना नेते तथा सचिव व कोकणातील ज्येष्ठ नेते माजी खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी देण्याची मागणी शिवसेना जिल्हा सचिव हरिश्चंद्र पाटील यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राने केल्याने खळबळ उडाली आहे.

शिवसेना जिल्हा सचिव हरिश्चंद्र पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलेय कि, वसई विधानसभा मतदार संघात 1990 पासून दहशत असल्याकारणाने शिवसेनेचा उमेदवार निवडून येवू शकला नाही. परंतू सन 2000 पासून शिवसेनेचा उमेदवार म्हणून अन्य पक्ष व संघटनेतील उमेदवारांना संधी देण्यात आली. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी शिवसेनेत गट-तट निर्माण केले. याचा पक्ष संघटनेला फटका बसला आहे. पुन्हा हे उमेदवार पक्ष सोडून गेले. अशांना अन्य पक्षाने उमेदवारी दिली तरी त्यांना यापुढील काळात शिवसैनिक कदापी साथ देणार नाही. काँग्रेसचे विजय पाटील वसई विधानसभेत तर पी.एस.फांऊडेशनचे प्रदीप शर्मा नालासोपारा विधानसभेत पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढले व पराभूत झाल्यानंतर पुन्हा स्वगृही परतले.

पक्षीय अहवालानुसार वसई व नालासोपारा विधानसभा मतदार संघात स्थानिक निष्ठावंत शिवसैनिक उमेदवार म्हणून मजबूत असेल किंवा कसे ही बाब प्रश्नास्पद आहे. अशा स्थितीत निष्ठावंत आम्हा वसईकर शिवसैनिकांना बविआ पक्षासमोर मातोश्रीचा कडवट सैनिक असलेले, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत हे नालासोपारा विधानसभा मतदार संघाकरिता उमेदवार हवे आहेत. नालासोपारा मतदार संघात 30 टक्के कोकणी मतदार असून एकूण 70 टक्के मराठी मतदार आहेत.

माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, विरार शहर प्रमुख विजय जाधव, गणेश भायदे, प्रदीप सावंत यांसारखे कोकणी पदाधिकारी प्रभावशाली आहेत. शिवसेनेचे स्थानिक जिल्हाप्रमुख पंकज देशमुख आहेत. देशमुख बविआ पक्षातून आले असून त्यांची जिल्हाप्रमुख म्हणून नेमणूक झाली आहे, मात्र त्यांना स्थानिक पदाधिकार्‍यांकडून सहकार्य होत नाही अशी स्थिती आहे. वसई विधानसभेकरिता मातोश्री चे लढवय्ये शिवसैनिक आमदार सुनिल शिंदे यांना उमेदवारी देणे संयुक्तिक ठरणार आहे. त्यांच्या उमेदवारीचं निश्चितपणे वसईतील निष्ठावंत शिवसैनिक स्वागत करतील तथा स्थानिक भुमिपुत्रांच्या या मतदार संघात निश्चितच विजय प्राप्त होईल.

आमदार सुनिल शिंदे यांनी संपर्क प्रमुख म्हणून वसईत चांगलं काम करून शिवसैनिक व पदाधिकार्‍यांची मनं जिंकलेली आहेत. सुशिक्षितांचा मतदार संघ असलेल्या वसई विधानसभा मतदार संघात कोळी, भंडारी, आगरी आदि समाजात सुनिल शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या मतदार संघात 25 टक्के कोळी समाज आहे. वसई विधानसभा मतदार संघातील स्थानिक पदाधिकारी जिल्हा सचिव लढवय्ये नेते मिलिंद खानोलकर, जिल्हा सहसचिव विवेक पाटील, उपजिल्हाप्रमुख जनार्दन म्हात्रे, महिला आघाडी जिल्हा समन्वयक सौ.किरण चेंदवणकर, वसई तालुका प्रमुख राजाराम बाबर अशी सर्व मंडळी एकत्रितपणे पक्ष प्रमुखांच्या आदेशानुसार मातोश्री च्या निष्ठावंत नेत्यांना विजयी करतील असा विश्वास आहे.

यापूर्वी जे उमेदवार होते ते दलबदलू असल्याने, शिवसेना प्रेमी मतदार व निष्ठावंत शिवसैनिक हे मातोश्रीचा आदेश असल्याने नाईलाजास्तव मतदान करताना दिसत होते. विनायक राऊत व सुनिल शिंदे हे दोन उमेदवार नालासोपारा व वसई विधानसभा मतदार संघासाठी मातोश्री ने दिल्यास, ते निश्चितपणे विजयी होतील अशी स्थिती आहे. नेतेच उमेदवार असल्यास स्थानिक गटतट संपुष्टात येतील असं शिवसेना जिल्हा सचिव हरिश्चंद्र पाटील यांनी पक्ष प्रमुखांना पाठविलेल्या विनंती पत्रात म्हटलं आहे.या पत्रामुळे ठाकरे गटात सारे काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. नालासोपारा मधून जिल्हा प्रमुख पंकज देशमुख निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांना यापूर्वी पदवीधर मतदार संघातून उमेदवारी देण्या बाबत विचार सुरु होता. या पत्र बोंम्ब ने मात्र मोठी खळबळ उडणार असल्याचे समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com