शिवसेनेचा रंग भगवाचं..! मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा टीकाकारांना टोला 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 February 2020

शिवसेनेचा रंग भगवा होता व भगवाच राहणार आहे, आम्हाला मित्राने दगा दिला म्हणून 30-40 वर्षे विरोधात असणार्या पक्षासोबत मैत्री करावी लागली. अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेने हिंदुत्व भगवा सोडला नाही. अशा शब्दात टीकाकारांना ठणकावले.

मुंबई: शिवसेनेचा रंग भगवा होता व भगवाच राहणार आहे, आम्हाला मित्राने दगा दिला म्हणून 30-40 वर्षे विरोधात असणार्या पक्षासोबत मैत्री करावी लागली. अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेने हिंदुत्व भगवा सोडला नाही. अशा शब्दात टीकाकारांना ठणकावले.

राज्यातील 917 शाळा होणार बंद! शिक्षण विभागाने घेतला हा निर्णय

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल असे वचन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते. ज्या खोलीत वचन दिले त्याच मातोश्री च्या खोलीत मित्रपक्षाने दिलेले वचन पाळले नाही. असा पुनरूच्चार करत उध्दव ठाकरे यांनी भाजप वर हल्लाबोल केला. 
बाळासाहेबांना दिलेले वचन पूर्ण झाल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलात शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा झाला. यावेळी 11 ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा व पत्नी रश्‍मी ठाकरे यांचा भव्यदिव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्व व भगवा हाती घेतल्याने उद्धव ठाकरे काय बोलतात याबाबत उत्सुकता होता. शिवसेनेचा भगवा आणि हिंदुत्व दोन्ही कायम असल्याचे रोखठोकपणे सांगत ठाकरे यांनी शिवसैनिकांना विश्वास दिला. 

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! विवाहित पुरूषासोबत लग्न केल्यास...

दरम्यान, राज याचा उल्लेख न करता उध्दव म्हणाले की मधल्या कालावथीत केवळ विरोधकांनी नव्हे घरातल्यांनी ही शिवसेनेवर वार केले. पण मी रडणारा नसून लढणारा आहे हे शिवसैनिकांच्या पाठबळावर दाखवून दिले. 

अनेक वर्षाच्या मित्रपक्षाने शिवसेनेला दिलेले वचन तोडले. शिवसेनेलाच खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला. पण मी केवळ उद्धव ठाकरे नसून उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. मी घाबरणारा नाही तर लढणार आहे. मी जर गप्प बसलो असतो तर तुम्हा सर्वांना काय तोंड दाखवले असते. अशा शब्दात भाजपवर हल्लाबोल केला. 

या विपरीत राजकिय परिस्थिती मुळेच चाळीस वर्षे ज्यांच्या विरोधात लढलो त्यांना सोबत घेऊन वेगळा मार्ग निवडला. शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रात आणली. असे स्पष्ट करत 
शिवसेनेने ना आपला रंग बदलला आहे ना शिवसेनेचे अंतरंग बदलले आहे. शिवसेनेचा रंग भगवाच होता व भगवाच आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena's color saffron ..! saysChief Minister Uddhav Thackeray