
रायगड जिल्ह्यात भरत गोगावले यांना पालकमंत्री पद न मिळाल्याने शिवसेना पक्षाला धक्का बसला आहे. अशातच शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकाश देसाई यांनी रविवारी (ता.19) पालीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना पक्षाला दुसरा धक्का बसला आहे.
प्रकाश देसाई यांनी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. दैनंदिन व्यस्त जीवनशैली व दैनंदिन कामातून पक्षाच्या कामास आवश्यक तो वेळ देता येत नसल्याने तसेच पक्षासाठी समाधानकारक काम करता येत नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे देसाई यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.