Ayodhya Ram Temple: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरात जय्यत तयारी; मुंबईतील शिवाजी पार्क दिव्यांनी उजळला

Ayodhya Ram Temple : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरात जय्यत तयारी करण्यात येत आहे. मोठमोठी शहरे दिव्यांनी उजळली आहेत.
Ayodhya Ram Temple
Ayodhya Ram TempleEsakal

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. देशातील मोठमोठी शहरे दिव्यांनी उजळली आहेत. दादर, मुंबईतील शिवाजी पार्क देखील उजळून निघाले आहे. नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील (Ayodhya) भव्य राम मंदिरात (Ram Mandir) रामल्लाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. अयोध्येच्या सोहळ्याचा मुहूर्त जवळ आला आहे. अयोध्येत भक्तांची गर्दी वाढत असून तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे.

तर मुंबईप्रमाणेच उत्तराखंडमधील डेहराडून शहरातील क्लॉक टॉवरवर लेझर लाइटद्वारे प्रभू रामाची चित्रे लावण्यात आली आहेत.

Ayodhya Ram Temple
Ayodhya Ram Mandir : भाविकांना अयोध्यानगरी आणि राम मंदिराच्या हवाई दर्शनाचीही सोय

प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्येत मोठी तयारी सुरू असून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पुजाविधींना सुरुवात झाली आहे. बुधवारी (17 जानेवारी) या विधींच्या दुसऱ्या दिवशी रामल्लाची मूर्ती मंदिर परिसरात नेण्यात आली होती. तर आज मूर्ती मंदिरातील गर्भगृहात ठेवली जाणार आहे.

22 जानेवारीला मंदिराच्या गर्भगृहात रामल्लाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात येणार आहे. या सोहळ्याला देश-विदेशातील अनेक दिग्गज उपस्थित असणार आहेत.

Ayodhya Ram Temple
Ayodhya Ram mandir : विरोधकांचे ‘चलो अयोध्या’ प्राणप्रतिष्ठेनंतर; शरद पवार, केजरीवाल यांची भूमिका

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त घरोघरी श्री राम ज्योती प्रज्वलित करण्याचे आवाहन केले आहे. हा ऐतिहासिक क्षण सुदैवाने आपल्या आयुष्यात आला आहे. या निमित्ताने सर्व 140 कोटी देशवासीयांनी 22 जानेवारी रोजी आपल्या घरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

Ayodhya Ram Temple
Ram Mandir: सुप्रीम कोर्टासह हाय कोर्टाला 22 जानेवारी रोजी सुट्टी? सरन्यायाधीशांच्या निर्णयाकडे लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com