esakal | शिवाजीपार्क आता 'या' नावानं ओळखलं जाणार...
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजीपार्क आता 'या' नावानं ओळखलं जाणार...

शिवाजीपार्क आता 'या' नावानं ओळखलं जाणार...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सचिन तेंडुलकर व अन्य नामवंत खेळाडू घडले, मान्यवर नेत्यांच्या राजकीय सभा गाजल्या. या मैदानाचा आता "छत्रपती शिवाजी महाराज पार्क' असा नामविस्तार झाला आहे. याबाबतचा 1927 मधील प्रस्ताव स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पुन्हा महापालिका सभागृहात मांडला. सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिल्यामुळे हा ठराव संमत झाल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केले. 

मोठी बातमी - भारतीय महिलांना एकट्याने "हे' करायला आवडतं!...

मुंबईतील दादर या मध्यवर्ती ठिकाणी असलेले शिवाजी पार्क मैदान राजकीय सभांनी सतत गाजत असते. महापालिकेने 1925 मध्ये हे मैदान जनतेसाठी खुले केले. या मैदानाचे मूळ नाव माहीम पार्क असे होते. मैदानाच्या एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा 1966 मध्ये उभारण्यात आला. शिवाजी पार्कचा कट्टा ही तरुणांसाठी गप्पागोष्टींची आणि वयस्कर मंडळींसाठी सकाळ-सायंकाळी फेरफटक्‍यानंतर विश्रांतीची जागा ठरली आहे. या परिसरात सावरकर स्मारक, उद्यान गणेश मंदिर, शिवाजी पार्क जिमखाना, माहीम स्पोर्टस क्‍लब, समर्थ व्यायाम मंदिर, बालमोहन विद्यामंदिर आदी वास्तू-संस्था आहेत. 

याच मैदानावर सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, संदीप पाटील, किरण मोरे, संजय मांजरेकर आदी क्रिकेटपटू घडले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक सभा याच मैदानावर गाजल्या. शिवसेनेचा दसरा मेळावा "शिवतीर्थ' म्हणजे याच मैदानावर होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी या परिसरात येतात. या कारणांमुळे शिवाजी पार्कला महत्त्व आले आहे. या शिवाजी पार्कच्या नामविस्ताराचा प्रस्ताव 10 मे 1927 रोजी आला होता. 

मोठी बातमी -  'कोरोना'संदर्भातील बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत, नागरिकांनी...

हा प्रस्ताव स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पुन्हा समहापालिका भागृहात मांडला. "छत्रपती शिवाजी महाराज पार्क' असा नामविस्तार करावा, अशा प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. एकमताने ठराव झाल्यामुळे हे ऐतिहासिक मैदान आता "छत्रपती शिवाजी महाराज पार्क' या नव्या विस्तारित नावाने ओळखले जाणार आहे. 

दोन वेळा प्रयत्न 
शिवसेनेच्या नगरसेवकांनी काही वर्षांपूर्वी दोन वेळा शिवाजी पार्कचे छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे नामकरण करण्याचे प्रयत्न केले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या नामकरणाला विरोध केला होता. परिणामी हा प्रस्ताव बारगळला होता. 

shivaji park of mumbai is now chatrapati shivaji maharaj park