भारतीय महिलांना एकट्याने "हे' करायला आवडतं!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 March 2020

एकट्याने प्रवास करण्याचा ट्रेंड भारतातही आता बऱ्यापैकी रुजला आहे. त्यात सर्वाधिक संख्या 19 ते 25 वर्षे वयोगटातील तरुणांची आहे. आता भारतीय महिलाही बिनधास्त एकट्याने प्रवास करत आहे.

मुंबई : एकट्याने प्रवास करण्याचा ट्रेंड भारतातही आता बऱ्यापैकी रुजला आहे. त्यात सर्वाधिक संख्या 19 ते 25 वर्षे वयोगटातील तरुणांची आहे. आता भारतीय महिलाही बिनधास्त एकट्याने प्रवास करत आहे. महिलांचा प्रवास करण्याचा कल 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये वाढला असून, त्यात तब्बल 63 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांचे प्रमाण 17 टक्‍क्‍यांवरून 19.7 टक्के झाले आहे. तथापि, स्त्रियांना प्रवासात एकाहून जास्त व्यक्तींची सोबत असण्याचे प्रमाण आजही 80.3 टक्के असल्याचे ओयो हॉटेल बुकिंग ऍपने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. 

ही बातमी वाचली का? सावधान! आजच सोडा धुम्रपान, नाहीतर भोगा हे परिणाम

ओयोने जानेवारी 2019 ते फेब्रुवारी 2020 या 14 महिन्यांत मुंबई, दिल्ली, बंगळूरु, कोलकाता, हैदराबाद या शहरांतील महिलांमध्ये हे सर्वेक्षण केले. या पाच शहरांत राहणाऱ्या महिला वर्षभर प्रवास करतात. हॉटेल बुक करण्यासाठी त्या ऍप व ऑनलाईन बुकिंगला प्राधान्य देतात, असा या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. या पाच शहरांतील महिलांचा एकट्याने प्रवास करण्याकडे जास्त कल असल्याचे आढळले. त्यांच्या संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. मेट्रो शहरांतील महिला अधिक प्रवास करतात. डेहराडून, म्हैसूर, लोणावळा या शहरांना महिलांची अधिक पसंती असल्याचे ओयो हॉटेल्स अँड होम्स इंडियाचे वरिष्ठ व्यवसाय अधिकारी हर्षित व्यास यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? समोर रिक्षा आल्याने बाईकचा तोल गेला आणि... 

भारतातील सण-उत्सवांच्या काळात सर्वांत जास्त हॉटेल बुकिंग दिल्ली शहरात केले जाते. दिवाळी आणि होळी या सणांच्या काळात तर दिल्लीतील हॉटेले "हाऊसफुल्ल' असतात. महिलांचे सुटीच्या काळातील सर्वाधिक पसंतीचे ठिकाण गोवा असल्याचे समोर आले. तेथील समुद्रकिनारी असलेल्या हॉटेलांच्या बुकिंगवरून हे निरीक्षण नोंदवण्यात आले. महिलांना नवीन ठिकाणी जाण्यास आवडते. डेहराडून, म्हैसूर आणि लोणावळा अशा गिरिस्थानांना त्या प्राधान्य देतात, असे या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे. 

दृष्टिक्षेपात 

  •  19. 7 टक्के महिला करतात एकट्याने प्रवास. 
  •  ऑनलाईन, ऍपद्वारे हॉटेल बुकिंगला प्राधान्य. 
  •  सुटीच्या काळात सर्वाधिक पसंती गोव्याला. 
  •  नवीन ठिकाणांना भेट देण्याकडे वाढता कल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The tendency of Indian women to wander alone