मुंबई - शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून यंदाही शिवसेना ठाकरे व शिंदे गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दोन्ही गटांकडून यासाठी अर्ज पालिकेकडे महिनाभरापूर्वीच अर्ज करण्यात आले आहेत. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही दोन्ही गटात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
शिवाय कोणताही गट न्यायालयात गेल्यास पुढील कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. त्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन येत्या दोन - तीन दिवसांत यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. त्यामुळे शिवाजी पार्क कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दसरा मेळाव्यावरून गेल्या वर्षी शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष पेटला होता. शिवाजी पार्कसाठी दोन्ही गटांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. आता यंदाही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळावे यासाठी दोन्ही गट आमने - सामने आले आहेत. दसरा मेळावा शिवाजी पार्कातच होणार असा निर्धार ठाकरे गटाने केला आहे, तर शिंदे गटाने यंदा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क आम्हालाच मिळणार असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
पालिकेच्या दादर जी - उत्तर विभाग कार्यालयात या दोन्ही गटाने यासाठी अर्ज केला आहे. यंदा शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाकडून विभाग प्रमुख महेश सावंत यांनी शिवाजी पार्क मिळण्यााठी पालिकेच्या दादर येथील जी उत्तर विभाग कार्यालयात अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळाले आहे, त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आम्हालाच परवानगी मिळेल असे शिंदे गटाकडून म्हटले जाते आहे.
तर दसरा मेळावा शिवाजी पार्कातच होणार असा निर्धार ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही गट आमने- सामने आले आहेत. यातील एखादा गट न्यायालयात गेल्यास कायदेशीर गुंतागुंत निर्माण होईल. हे टाळण्यासाठी कायदेशीर बाबी तपासून येत्या दोन- तीन दिवसांत पालिकेकडून य़ावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.
गेल्यावर्षी शिवाजी पार्कवरून पालिकेने टाळाटाळ केल्याचा आरोप करीत ठाकरे गटाने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. अखेर प्रशासकीय चूक लक्षात आणून दिल्यानंतर ठाकरे गटाला हे मैदान मिळाले होते. आता यंदाही शिवाजी पार्कसाठी हे गट आमने -सामने आले आहेत.
मैदान मिळण्यासाठी दोन्ही गटांनी जी - उत्तर विभाग कार्यालयात अर्ज सादर केले असून पहिला अर्ज कोणाचा आला त्याबाबत विभाग कार्यालयाने गुप्तता ठेवली आहे. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानातच होईल, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाने व्यक्त केला. तर शिवसेना पक्ष व चिन्ह आम्हाला मिळाले आहे.
शिवाय गेल्या ऑगस्टमध्ये यासाठी अर्ज पालिकेच्य़ा जी - उत्तर विभागाकडे करण्यात आला आहे, त्यामुळे शिवाजी पार्क आम्हाला मिळेल असे शिदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी सांगितले. त्यामुळे यंदा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.