शिवभोजन केंद्रासाठी वाढीव शिवभोजन थाळ्यांना मंजुरी...

शिवभोजन केंद्रासाठी वाढीव शिवभोजन थाळ्यांना मंजुरी...

अलिबाग : राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त शिवभोजन केंद्रातून शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे परराज्यासह अन्य जिल्ह्यांतील अनेक कामगार, मजूर रायगड जिल्ह्यातील पनवेल, खोपोली, खालापूर, उरण, कर्जत, पेण, अलिबाग या भागात अडकून पडले आहेत. रोजगाराअभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शिवभोजन केंद्रासाठी वाढीव शिवभोजन थाळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. 

पनवेल (महानगरपालिका क्षेत्र) मंजूर थाळींची संख्या 3 हजार 150, पनवेल (ग्रामीण क्षेत्र) 2 हजार, अलिबाग शहर- 1 हजार 50, अलिबाग (ग्रामीण)- 400, पेण- 1 हजार 100, मुरूड- 400, उरण- 2 हजार 100, रोहा- 1 हजार 100, सुधागड- 475, कर्जत- 400, खालापूर- 2 हजार 100, महाड- 600, माणगाव-600, पोलादपूर- 475, म्हसळा-425, श्रीवर्धन- 600, तळा-325  थाळ्याचा समावेश आहे.

जिल्ह्यातील सर्व कार्यरत शिवभोजन केंद्रांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सूचना पाळणे आवश्यक आहे. ही भोजनालये दररोज फक्त सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उपलब्ध असणार आहेत. शिवभोजन तयार करणा-या व्यक्तींनी शिवभोजन तयार करण्याआधी त्यांचे हात कमीत कमी 20 सेकंद साबणाने स्वच्छ धुवावेत. त्याकरिता शिवभोजन चालकाने शिवभोजन उपलब्ध करून देताना ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून द्यावेत. शिवभोजनाची सर्व भांडी निर्जूंतक करून घ्यावीत. तसेच भोजनालय चालकांनी त्यांचे भोजनालय दररोज निर्जूंतक करून घ्यावेत, असे नियम लागू केले आहेत.

रायगड जिल्ह्यामध्ये अडकलेल्या इतर राज्यातील तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांतील कामगार, मजूर, गरीब, गरजू लोकांनी शिवभोजन थाळीची सोय केली आहे. 
- निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

shivbhojan center to start serving extra plates of affordable food in raigad district

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com