
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर स्मशानभूमीत ठेकेदाराची मनमानी सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. एकीकडे लहान मुलांना लाकड उचलण्यास लावण्यात आली आहेत. तर दुसरीकडे अतिरेकी हल्ल्यातील मूर्त पर्यटकांच्या शवपेट्या अजूनही परिसरात तशाच पडून आहेत. या दोन्ही घटनेचे व्हिडीओ समाज माध्यमातून व्हायरल झाले आहेत. यामुळे पालिका प्रशासन आता तरी या ठेकेदारावर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.