esakal | शिवसेना भाजपा पुन्हा आमने सामने
sakal

बोलून बातमी शोधा

BJP-Shiv Sena

शिवसेना भाजपा पुन्हा आमने सामने

sakal_logo
By
रविंद्र खरात

कल्याण : महाविकास आघाडी ने मागील दोन वर्षे विकास निधी न दिल्याने कल्याण पश्चिमच्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शनिवारच्या एका कार्यक्रमात केला होता त्याला काही तास उलटत नाही तोच शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी पलटवार करत भाजपने कल्याण पश्चिम विधानसभेत 5 वर्षात काय विकास केला आहे, ते आधी सांगा. पत्रीपूल, वडावली पूल, दुर्गाडी पूल आणि रिंगरूट अशी अनेक कामे महाआघाडी सरकारच्या कार्यकाळात झाली आहेत .यामुळे शिवसेना भाजपा मध्ये विकास कामामुळे राजकीय कलगीतुरा रंगला आहे. (Mumbai News)

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातील उद्यानसाठी विशेष निधी आणला होता. त्या निधी मधून शनिवार ता 4 सप्टेंबर रोजी एका उद्यानाचे लोकपर्ण केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले होते, यावेळी पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार वर टिका करत मागील दोन वर्षात कल्याण पश्चिमसाठी विकास निधी दिला नसून भाजपाच्या कालावधीत असलेल्या कामाचे उद्घाटन काम करत असल्याची टिका करत आगामी पालिका निवडणूक मध्ये कायम भाजपाची सत्ता असेल असा दावा केला होता.

हेही वाचा: 'सरकारला लॉकडाऊन बरा वाटतोय', राज ठाकरेंची टीका

पाटील यांच्या प्रतिक्रियेला काही तास होत नाही तोच कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी पलटवार केला असून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या आरोपाला निराधार असल्याचे सांगत भाजपने कल्याण पश्चिम विधानसभेत 5 वर्षात काय विकास केला आहे, ते आधी सांगा असा प्रतिसवाल केला असून कल्याण मधील पत्रीपूल, वडावली पूल, दुर्गाडी पूल आणि रिंगरूट अशी अनेक कामे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू आणि काही पूर्ण झाली असून भाजप नेते आणि मंत्री फेकू असल्याचा हल्लाबोल करत त्यांच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवत नसून पालिका निवडणूक मध्ये सत्तेची स्वप्न विरोधी पक्ष पाहत असून ती कधीही पूर्ण होणार नसून आगामी पालिका निवडणुकीत शिवसेना भाजपाला एक-दोन बाय चार दाखवू , भाजप हवेत उडण्याचा कोणताही मागमूस राहणार नसल्याचे आमदार भोईर म्हणाले.

loading image
go to top