esakal | 'सरकारला लॉकडाऊन बरा वाटतोय', राज ठाकरेंची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

राज ठाकरे

'सरकारला लॉकडाऊन बरा वाटतोय', राज ठाकरेंची टीका

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तो पर्यंत राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सर्व राजकीय पक्षांनी घेतली आहे. त्यास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिला. पण हा पाठिंबा देताना ‘‘ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकीला स्थगिती देऊन काही होणार नसेल, त्याऐवजी केवळ महापालिकांवर प्रशासक नेमून सरकारचा उगीच फायदा व्हायला नको’’, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नवी पेठेत आयोजित केली होती, त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Pune News)

ओबीसी आरक्षणावर ठाकरे म्हणाले, ‘‘ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतरच निवडणुका झाल्या पाहिजेत. पण नुसत्या निवडणुका स्थगित करून काही होणार नसले, सरकारचा फायदा होणार असेल, यात काही तरी काळेबेरे असेल तर ते समजून घ्यायला हवे. सरकारलाच सध्या महापालिका निवडणुका नकोत, यावर प्रशासक नेमला की सरकारच सर्व महापालिका चालवणार. ओबीसीचा विषय पुढे करून सरकारचे सर्व उद्योगधंदे सुरू आहेत, असे नको व्हायला. सरकारकडे सर्व यंत्रणा आहे, मनात आणले तर इम्पेरिकल डेटा गोळा करणे यासह सर्व गोष्ट करू शकतात.

हेही वाचा: माय टूर : शानदार पॅलेस इस्टेट, पाक सिमेवरील लखपतचा नजरा

सरकारला लॉकडाऊन बरा वाटतोय

दहीहंडी, गणेशोत्सवावर बंधने आणल्याबद्दल ठाकरे म्हणाले, ‘‘सरकार व पक्षांचे कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहेत, तेथे गर्दी जमत आहे. फक्त सरकारला गणेशोत्सवाची गर्दी नको आहे. नियम हे सर्वांसाठी सारखे असले पाहिजेत. एकंदरीत या लॉकडाऊन मध्ये जे चालले आहे ते बर चालले आहे हे सर्व सरकारांना लक्षात आले आहे. आंदोलन नाही, मोर्चे नाहीत, सरकारच्या विरोधात कोणी बोलायचे नाही, लोकांनी रस्त्यावर उतरायचे नाही, त्यामुळे कोणती झंझटच नसल्याने आपापले पैसे कमवा, दुकाने चालवा असेच एकंदरीत धोरण आहे. नुसती कोरोनाची तिसरी लाट येणार, चौथी लाट येणार म्हणून भितीचे चित्र उभे केले जात आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. शाळांमधील मुलांना लस देता येत नाही, त्यामुळे शाळा कशी सुरू करणार? पण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले की महाविद्यालये सुरू करता येतील.

ॲमेनिटी स्पेसभर भाष्य टाळले

पुणे शहरातील २७० ॲमेनिटी स्पेस दीर्घकाळ भाड्याने देऊन त्यातून १७५२ कोटी रुपये उत्पन्न मिळवले जाणार आहे. पुणेकरांच्या हक्काच्या जमिनी श्रीमंतांच्या घशात घातल्या जात आहेत, असा आरोप विरोधकांनी केली आहे. यावर मनसेची भूमिका काय असे ठाकरे यांना विचारले असता ‘माझ्या पदाधिकाऱ्यांनी बोललो आहे, असे सांगत यावर भाष्य करणे टाळले.

loading image
go to top