आगामी BMC निवडणूकीमध्ये शिवसेनेची गुजराती मतदारांना साद; 30 जणांना उमेदवार उतरवण्याची शक्यता

समीर सुर्वे
Sunday, 10 January 2021

.'जलेबी फाफडा अनं उध्दव ठाकरे आपडा' या कार्यक्रमात 100 व्यापारी आणि उद्योजकांनी उपस्थीती नोंदवली असून 11 नामांकित व्यापाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

मुंबई : फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीत शिवसेनेकडून 30 गुजराती उमेदवारी उतरवले जाण्याची शक्‍यता आहे.त्याची सुरवात आज पासून झाली.'जलेबी फाफडा अनं उध्दव ठाकरे आपडा' या कार्यक्रमात 100 व्यापारी आणि उद्योजकांनी उपस्थीती नोंदवली असून 11 नामांकित व्यापाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

 

मुंबईत गुजराती मतदारांची संख्या 15 लाखहून अधिक असून थेट 30 प्रभागात गुजराती मतदार नगरसेवक निवडणुक आणू शकतात.तर,10 हून अधिक प्रभागात गुजराती मतं निर्णायक ठरू शकतात.सध्या शिवसेनेचे राजू पटेल आणि संध्या दोशी असे दोन गुजराती मतदार आहेत.मात्र,भाजपला महापालिका निवडणुकीत रोखायचे असल्यास गुजराती समाजाची मतं आवश्‍यक असल्याने शिवसेनेने आता पासून तयारी सुरु केली आहे.जोगेश्‍वरी येथील गुजराती भवन मध्ये आज शिवसेनेचे राष्ट्रीय संघटन हेमराज शहा यांच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात 100 गुजराती व्यापारी आणि उद्योजकांनी हजेरी लावली.तर,11 जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

गुजराती समाजाने आता पर्यंत भाजपला पाठींबा दिला.पण,त्याचा फायदा झाला नाही.नोटबंदी,वस्तू व सेवा कर यामुळे व्यापाराने मार खाल्ला आहे.1992-93 च्या दंगलीत शिवसेनेने गुजरातीसह सर्वच हिंदूचं संरक्षण केलं.शिवसेनेने आता पर्यंत सर्वांसाठी दिले असून आता शिवसेना अधिक पाठींबा देण्याची गरज आहे.असे हेमराज शहा यांनी सांगितले.तर,भाजपला पाठींबा देऊन काहीच फायदा होत नाही हे आता गुजराती समाजाच्या लक्षात आले आहे.असे नगरसेविका राजूल पटेल यांनी सांगितले. 

Shiv Sena appeals to Gujarati voters in upcoming BMC elections

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivSena appeals to Gujarati voters in upcoming BMC elections