"भविष्यात ज्या घडामोडी घडणार आहेत, त्या भूकंपाचा केंद्रबिंदू सेनाभवन असेल"

"भविष्यात ज्या घडामोडी घडणार आहेत, त्या भूकंपाचा केंद्रबिंदू सेनाभवन असेल"

मुंबई : मुंबईतील शिवसेना भवनात आज नाशिक आणि धुळ्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलाय. शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत भाजपमधील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.  यावेळी बोलताना संजय राऊत यांनी फडणवीसांना आणि भाजपाला टोला लगावलाय. "आमचा एकही फुटणार नाही, असं काही लोक म्हणत होते. थोडे दिवस थांबा, काय फुटेल ते पाहाल", असं संजय राऊत म्हणालेत. 

नुकतेच शिवसेनेतील बाळासाहेब सानप यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. यावेळी आमचा एकही नेता फुटणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आज धुळे आणि नाशिकमधल्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी एक सूचक विधान केलं आहे, "भविष्यात ज्या घडामोडी घडणार आहेत, त्या भूकंपाचा केंद्रबिंदू सेनाभवन असेल, असं देखील संजय राऊत म्हणालेत.

कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

कोरोनामुळे वर्षभर लोक त्रासात आहेत, पण तरीही लोकांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. प्रत्येक संकटाशी आम्ही सामना करू शकू. हे सरकार तीन पक्षांचे सरकार आहे. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सामील आहेत. त्यामुळे एकाच पक्षातून आता इनकमिंग होणार आहे. 

पुढे संजय राऊत म्हणालेत की, "पुढील पाच वर्षे सोडाच किमान वीस ते पंचवीस वर्ष सरकार टिकावे आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासोबतच देशाचं देखील राजकारण करावं आणि तसेच होईल असं देखील खासदार संजय राऊत म्हणालेत.  

या पक्षाचे कुटुंबप्रमुख हे बाळासाहेब ठाकरे

शिवसेना हा फक्त राजकीय पक्ष नाही, या पक्षाचे कुटुंबप्रमुख हे बाळासाहेब ठाकरे आहेत. पक्षात नेते येतात आणि जातात, पण कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. तेच पाय रोवून बसतात. आपण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि महाराष्ट्र पुढे नेऊयात.

आता काहिकरून नाशिकवर भगवा फडकवायचा

धुळे आणि नाशिक आपल्यासाठी महत्वाचं आहे. मागील 5 वर्षांचे विसरा, पण आता काहिकरून नाशिकवर भगवा फडकवायचा आहे. उतर महाराष्ट्रातून अनेक राजकीय कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. शिवसेनेत आता उद्योग आघाडी आली आहे आणि समोरच्यांना उद्योग राहिले अशीही टीका राऊतांनी केलीये. 

shivsena bhawan will be epicenter of major political happening in the future sanjay raut

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com