Vidhan Sabha 2019 : बाळासाहेबांचे दर्शन घेऊन आदित्यने टाकले मातोश्रीबाहेर पाऊल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

आदित्य ठाकरे आज अर्ज भरण्यासाठी रवाना होत असताना पत्रकारांशी बोलले. त्याठिकाणी पदयात्रा काढण्यात येणार आहे. चांगलं काम कर अशा शुभेच्छा उद्धव ठाकरेंनी दिल्या. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई : ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आदित्य ठाकरे आज (गुरुवार) वरळी विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरत आहेत. त्यापूर्वी त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगल काम कर अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

आदित्य ठाकरे आज अर्ज भरण्यासाठी रवाना होत असताना पत्रकारांशी बोलले. त्याठिकाणी पदयात्रा काढण्यात येणार आहे. चांगलं काम कर अशा शुभेच्छा उद्धव ठाकरेंनी दिल्या. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाची सेवा करण्याची इच्छा असल्याचे आदित्य यांनी सांगितले.

त्यापूर्वी बुधवारी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आदित्यसाठी कोणत्याही विरोधकाकडे जाणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. जे काही बोलायचे आहे ते दसरा मेळाव्यात बोलेन, असेही ते म्हणाले होते. 

तरुणांनी पुढे यावे 
महाराष्ट्राच्या विकासासाठी आदित्य राजकारणात उतरला आहे. त्याप्रमाणे तरुणांनी पुढे येऊन राजकारण हातात घ्यावे. आता तरुणांनी पुढे येऊन महाराष्ट्र आणि देश घडवला पाहिजे, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena chief Uddhav Thackeray wishes Aditya Thackeray for contest in Worli constituency