डॅशिंग नेते नितीन नांदगावकर यांना शिवीगाळ करत धमकीचा फोन

डॅशिंग नेते नितीन नांदगावकर यांना शिवीगाळ करत धमकीचा फोन

मुंबईः शिवसेना नेते नितीन नांदगावकर  यांना सोमवारी अज्ञात नंबरहून फोन करून धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नांदगावकर यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर नितीन नांदगावकर यांनी नेहरूनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. काही दिवसांपूर्वीच एका रिक्षा चालकाला अवाजवी रक्कम आकारल्या प्रकरणी नांदगावकर यांनी पवईच्या हिरानंदानी रुग्णालयातील  प्रशासनाला धारेवर धरले होते. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

शिवसेनेचे डॅशिंग नेते अशी नितीन नांदगावकर यांची ओळख आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यापर्यंत ते मनसेत होते. मनसेतून त्यांनी ऑगस्ट महिन्यातच शिवसेनेत प्रवेश केला. भूमिपूत्रांसह गरीबांच्या न्याय हक्कासाठी ते सदैव लढत असतात.  नांदगावकर हे कायम गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरताना सर्वांनी पाहिलं आहे. चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवतात. त्यांच्या या स्टाईलचे महाराष्ट्रात लाखो चाहते आहेत.

सोमवारी सकाळी ११ वाजून १७ मिनिटांच्या सुमारास त्यांना फोनवरुन धमकी देण्यात आली आणि शिवीगाळ करण्यात आली असंही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

नितीन नांदगावकर यांनी काय म्हटलं तक्रारीत 

१७ जुलैला हिरानंदानी हॉस्पिटल येथे जाऊन रिक्षा चालक कोरोना रुग्णाचे बिल कमी होणेबाबत आणि मृतदेह ताब्यात मिळण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांशी माझा वाद झाला होता. सदर हिरानंदानी रुग्णालयाचे सीईओ डॉ. सुजित चटर्जी यांना जाब विचारला असता त्यांनी मला दम देत सांगितले की आठ लाख भरा आणि मृतदेह घेऊन जा. पण मी त्यांना एकही रुपया भरणार नाही आणि मृतदेह घेऊन जाणार नाही असे सांगून रिक्षा चालकाचा मृतदेह घेऊन आलो.

त्यावेळी तिथल्या सुरक्षा रक्षकांनी मला धक्काबुक्की केली आणि माझ्या अंगावर धावून येण्याचाही प्रयत्न केला. यानंतर  २० जुलैला सकाळी ११.१७ च्या सुमारास माझ्या मोबाइलवर ९XXXXXXX३ या क्रमांकावरुन फोन आला आणि मला शिव्या देण्यात आला. तुम्हारे साथ क्या होगा समझ जाओगे अशीही धमकी देण्यात आली, असं नितीन नांदगावकर यांनी तक्रारीत म्हटलंय. या तक्रारीनंतर पोलिस अधिक तपास करताहेत.

Shivsena Dashing leader Nitin Nandgaonkar receive threatened call

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com