आदित्य ठाकरे झळकतायत सॅनिटरी नॅपकिन्सच्या पाकिटांवर..सॅनिटरी नॅपकिन्सवर शिवसेनेची जाहीरातबाजी..

aditya thackeray
aditya thackeray

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. मुंबईला कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. अशातच राज्य सरकार वेगवेगळ्या पातळीतून नागरिकांना मदत करताना दिसत आहे. सर्वच राजकीय पक्ष ही नागरिकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र ही मदत करताना शिवसेनेकडून जाहीरातबाजी झाल्याचं चित्र मुंबईत पाहायला मिळालं. 

कुलाबा विधान परिसरात शिवसेनेकडून महिलांसाठी सॅनिटरी पॅड्सचं वाटप करण्यात आलं. शिवसेनेकडून गरजूंसाठी ५०० सॅनिटरी नॅपकिन्सची पाकिट वाटण्यात आली. या सॅनिटरी पॅड्सच्या पाकिटावर आदित्य ठाकरेंचा फोटो लावण्यात आला होता. युवती आणि युवा सेनेकडून या मोफत सॅनिटरी पॅड्सचं वाटप केलं गेलं. त्यावर आदित्य ठाकरे आणि शिवसेना फोटो लावून जाहीरातबाजी केली गेली. कुलाबा परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांकडून हे वाटप करण्यात आलं आहे.  त्यामुळे अशी परिस्थिती असताना जाहीरातबाजी करण्याची गरज आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

मुंबईतली परिस्थिती गंभीर: 

सध्या मुंबईत कोरोनाचा कहर जास्त आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणं सील करण्यात आलेत. काही कंन्टेंमेंट झोन आहे. त्यामुळे महिलांना घराबाहेर पडत येत नाही. या नागरिकांना मदत करण्यासाठी अनेक संस्था, राजकीय पक्ष पुढे सरसावले आहे. असाच प्रयत्न करुन शिवसेनेनं महिलांसाठी सॅनिटरी पॅड्सचं वाटप केलं, पण त्यावर जाहीरातबाजी करणं खरंच गरजेचं होतं का? असाच सवाल उपस्थित केला जात आहे. 

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतानाच दिसतोय. राज्यात आकडा पाहिल्यावर सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबईत आहे. अनेक ठिकाणं सील केली असून अत्यावश्यक सेवांची दुकानंच सुरु आहेत.

shivsena doing advertising for sanitary pads with photo of aditya thackeray on it read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com