90 च्या दशकातल्या शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये नाराजी, पालिकेत महत्त्वाचं स्थान नाही

90 च्या दशकातल्या शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये नाराजी, पालिकेत महत्त्वाचं स्थान नाही

मुंबई: शिवसेनेचे 90 च्या दशकात निवडून आलेले नगरसेवक आज उपेक्षित राहीले आहेत. गेल्या तीन वर्षात या शिलेदारांपैकी अनेकांना पालिकेत महत्वाची पदे मिळालेली नसल्याने नाराजी वाढू लागली आहे.

मिलिंद वैद्य हे 1996 मध्ये महापौर होते. ते पहिल्यांदा 1992 मध्ये निवडून आले होते. नगरसेवक निवडणुकीपासून लांब राहिलेल्या वैद्य यांना 2011 मध्ये पोट निवडणुकीत माहिममधून पक्षाने उमेदवारी दिली. तेव्हा पक्षाला हमखास विजयाची खात्री वैद्यच देऊ शकत होते. 2017 मध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढत असल्याने विजयासाठी वैद्य यांना उमेदवारी दिली. ते निवडूनही आले. पण,गेल्या तीन वर्षात त्यांना प्रभाग समिती व्यतिरीक्त कोणतेही पद मिळाले नाही.

प्रतिक्षानगर,शिव कोळीवाडा मधील नगरसेवक मंगेश सातमकर हे शिवसेनेचे अभ्यासू नगरसेवक मानले जातात. सातमकर हे पहिल्यांदा 1994 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. ते  2017 मध्ये चौथ्या वेळेस निवडून आले.

मात्र, शिक्षण समिती अध्यक्षा व्यतिरीक्त कोणतेही महत्वाचे पद त्यांना मिळालेले नाही. स्थायी समिती अध्यक्ष पदाची ते 2009 पासून प्रतिक्षा करत आहेत. पण,त्यांना यंदाही संधी मिळाली नाही. वरळी येथील आशिष चेंबूरकर, लोअर परळ येथील रमाकांत रहाटे यांची परिस्थितीही अशीच आहे. चेंबूरकर यांना बेस्ट समितीचे अध्यक्ष पद मिळाले आहे. एकदा वरळी विधानसभाही त्यांनी लढवली आहे. मात्र रमांकात राहाटे यांच्या नशिबी कधीही महत्वाच्या समितीचे पद आले नाही. उपनगरातील जोगेश्‍वरी येथील राजू पेडणेकरही गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक आहेत. मात्र,त्यांना महत्वाच्या समितीचे अध्यक्ष पद मिळालेले नाही.

शिवसेनेची रणरागिणी फक्त स्पर्धेतच

शिवसेनेची रणरागिणी म्हणून ओळख असलेल्या जोगेश्‍वरी येथील राजूल पटेल याही 4 पेक्षा जास्त वेळ नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. मात्र,त्यांना आरोग्य समितीच्या अध्यक्ष पदाशिवाय कोणतेही महत्वाचे पद मिळालेले नाही. तर,दहिसर येथील शितल म्हात्रे दोन वेळा नगरसेवक निवडून आल्या असल्या तरी त्यांनाही कोणतेही महत्वाचे पद मिळालेले नाही.

--------------

(संपादनः पूजा विचारे)

ShivSena elected corporators 90 have neglected not given important posts BMC

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com