उघड्या गटारात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह अखेर सापडला

उघड्या गटारात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह अखेर सापडला

मुंबईः घाटकोपरमध्ये उघड्या गटारात पडून वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह समुद्रकिनारी सापडला आहे. शनिवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपरमध्ये एक महिला गटारावरील झाकण उघडं होतं. त्यामुळे त्यात ही महिला पडून वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर त्या महिलेचं मृतदेह हाजीअली येथील समुद्रात सापडल्यानं खळबळ उडाली आहे. 

शीतल जितेश भानूशाली असे या 32 वर्षीय महिलेचे नाव असून घाटकोपरमध्ये त्या आपल्या कुटुंबासह राहतात. शनिवारी संध्याकाळी त्या आपल्या मुलासह गिरणीमध्ये दळण घेऊन गेल्या होत्या. त्यांनी काही वेळानं त्यांच्या मुलाला घरी पाठवून दिले आणि दळण दळेपर्यंत त्या गिरणीत उभ्या होत्या. दळण घेऊन घरी येत असताना संध्याकाळी सात वाजताच्या दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि रस्त्यावर, चाळीत मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते.  या वेळी त्यांच्या कुटुंबाने फोनवर त्यांना संपर्क केला असता पावसामुळे ते एक ठिकाणी निवाऱ्याला उभ्या असल्याचे त्यांनी सांगितले.  मात्र हा त्यांचा शेवटचा संपर्क होता. त्यानंतर त्या रात्री घरी परतल्याच नाही. त्यांचे कुटुंब वारंवार त्यांचा शोध घेत होते मात्र त्या आढळून आल्या नाहीत.

अखेर भानूशाली यांच्या कुटुंबियांनी रात्री घाटकोपर पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली. सकाळी त्यांचा पुन्हा शोध घेऊ लागले असता एका गल्लीत अर्धवट उघडलेल्या गटाराच्या झाकणाच्या बाजूला त्यांची दळणाची पिशवी पडलेली आढळली.  हे गटार साधारणतः चार फूट खोल होते आणि शनिवारी त्यावरून मोठ्या प्रमाणत पाणी देखील वाहत होते. 

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेले चार दिवस हे झाकण उघड्या स्थितीत होते अशी माहिती त्यांनी दिली. या नंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्वरित घाटकोपर पोलिसांना या बाबत माहिती दिली. घाटकोपर पोलिसांनी अग्निशमन दल आणि आणि पालिकेला याची माहिती दिली. घटनास्थळी अग्निशमन दल, पालिका कर्मचारी दाखल झाले आणि त्यांनी या महिलेचा गटारात उतरून शोध सुरू केला होता मात्र काहीच हाती लागले नाही. 

दरम्यान रविवारी संपूर्ण दिवसभर अग्निशमन दल आणि पालिका शोधकार्य करत होते. अखेर सोमवारी सकाळी या महिलेचा मृतदेह हाजीअली येथील समुद्रकिनारी आढळला आहे. 

गेल्या काही वर्षात वारंवार उघड्या गटारात माणसे पडून वाहून गेल्याचा घटना घडत असताना पालिकेने फायबरची गटारावरील झाकणे, तुटलेली झाकणे या बाबत काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. याबाबत आयुक्तांनी चौकशी करुन या प्रकरणाचा अहवाल १५ दिवसाच्या आत सादर करण्याचे आदेश दिलेत.

---------------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Ghatkopar fallen manhole women body found hajiali beach

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com