किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेनेची फिल्डिंग, अब्रुनुकसानीचा फास्ट ट्रॅक न्यायालतात दावा ?

मृणालिनी नानिवडेकर
Monday, 11 January 2021

भाजपनेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने चालवलेल्या आरोपांमुळे ठाकरे कुटुंबाच्या प्रतिमेला अकारण तडा बसतो आहे.

मुंबई :  भाजपनेते किरीट सोमय्या सोमैया यांनी सातत्याने चालवलेल्या आरोपांमुळे ठाकरे कुटुंबाच्या प्रतिमेला अकारण तडा बसतो आहे. किरीट सोमय्या शांत होणार नाहीत हे गृहीत धरत आता त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा लावण्याची चाचपणी शिवसेनेने सुरु केली आहे. कोणतीही बेलगाम विधाने करता आहात, ती सिध्द करा अन्यथा माफी मागा असा दावा ठोकण्याचा शिवसेनानेत्यांचा विचार आहे.

मानहानीचे दावे वर्षानुवर्षे सुरु असतात, नंतर ते विस्मृतीत जातात त्यामुळे हा कालापव्यय टाळण्यासाठी खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवा अशी विनंती न्यायालयाला करता येईल काय ही शक्यताही तपासून पाहिली जाते आहे.

महत्त्वाची बातमी : रेल्वे प्रवासी संघटनेचे उद्याच्या निर्णयाकडे लक्ष; लोकल सुरू न केल्यास आंदोलनाची तयारी 

शिवसेनेच्या शीर्षस्थ नेत्यांनी या संदर्भात ठाकरे परिवाराशी चर्चा केली आहे. पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात अंतिम निर्णय सांगतील आणि त्यानुसार दाव्याची तयारी केली जाईल असे एका उच्चपदस्थ नेत्याने सांगितले.यासंदर्भात उच्च व सर्वोच्च न्यायालयातील नामवंत वकिलांशी सल्लामसलत करण्यात येते आहे.

किरीट सोमय्या यांनी अलिबाग येथील रश्मी उध्दव ठाकरे यांच्या घराबाबत जे आरोप केले आहेत, त्यात तथ्य नाही. ते आयकर विवरणासारख्या काही महत्वाच्या कागदपत्रात नमूद केले असल्याचेही सांगण्यात येते आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

वर्षपूर्तीनंतर महाविकास आघाडी सरकार स्थिरस्थावर झाल्याने आता प्रतिमासंवर्धनाकडे लक्ष देण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. थेट उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबियांवर दररोज होणारे आरोप जनतेच्या मनात किंतू निर्माण करतात असे मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख सहकार्यांनी त्यांना सांगितले.ग्रामपंचायत निवडणुका सुरु आहेत आणि महापालिका निवडणुका येवू घातल्या असल्याने आता भाजपला अपप्रचाराची संधी मिळू देता कामा नये असे एका मंत्र्याने सांगितले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

shivsena to file defamation case in fast track against bjp leader kirrit somayya


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena to file defamation case in fast track against bjp leader kirrit somayya