कल्याण-शीळ रोड अपघातात शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा मुलगा जखमी

kalyan-shil road accident
kalyan-shil road accidentsakal media

डोंबिवली : कल्याण-शीळ रोडवर (Kalyan-shil road accident) सोमवारी रात्री झालेल्या अपघातात तीन गाड्यांचे नुकसान झाले आहे. अपघातात कल्याण येथील शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या (Shivsena former corporator) गाडीचाही समावेश असून त्यात त्यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. या गाडीत माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचा मुलगा हरमेश शेट्टी (harmesh shetty injured) व त्यांचा चालक होता. यामध्ये हरमेशला किरकोळ मार लागला असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी (Manpada Police) दिली. (Shivsena former corporators son harmesh shetty injured in kalyan-shil road accident)

kalyan-shil road accident
फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्ला यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

अपघातग्रस्त दोन गाड्या रस्त्यावर उभ्या असलेल्या पाठीमागून आलेल्या मर्सिडीज गाडीने त्यांच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे कार पलटी झाली आणि तिसऱ्या गाडीचेही नुकसान झाले. याच गाडीत माजी नगरसेवक शेट्टी यांचा मुलगा होता. कल्याण शीळ रोडचे संथगतीने काम सुरु असून, यापूर्वी या रोडवर एका अपघातात कारचा चक्काचूर झाला होता. त्यानंतर आता घडलेल्या या अपघाताने या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कल्याण शीळ रोडवर शीळ फाट्याकडून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी रात्री अपघात झाला. टाटा नाका नजीक पांडूरंगवाडी येथे रस्त्याचे काम सुरु आहे. याठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला मातीचा ढिगारा आहे. या ठिकाणी यापूर्वीही एक अपघात घडला असून त्यात कारचा चक्काचूर होऊन चालक गंभीर जखमी झाला होता. सोमवारी रात्री कल्याणच्या दिशेने जाणारा एक टेम्पो दुभाजकाला धडकल्याने तो पलटी झाला.

यावेळी मागून येणाऱ्या व्हॅगेनर कारची टेम्पोला धडक बसली. या अपघाताची तक्रार देण्यासाठी दोन्ही वाहन चालक मानपाडा पोलिस ठाण्यात गेले होते. दरम्यान यावेळी रस्त्याने जाणाऱ्या मर्सिडीज कारने रस्त्यावरील ्अपघातग्रस्त वाहनाच्या बाजूने गाडी काढण्याचा विचार केला. गाडीला वेग असल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर गाडी चढून पलटी होऊन अपघात घडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com