Pune | शिवसेना म्हणजे मागासवर्गीयांवर अन्याय करणारी सेना; सुधाकर भालेराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena
शिवसेना म्हणजे मागासवर्गीयांवर अन्याय करणारी सेना; सुधाकर भालेराव

शिवसेना म्हणजे मागासवर्गीयांवर अन्याय करणारी सेना; सुधाकर भालेराव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - गेल्या दोन वर्षापासून महाविकास आघाडी सरकारने पदोन्नतीतील आरक्षण बंद केले, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दिली नाही, मागासवर्गीय महामंडळांचा निधी कमी केला. दलितांवर अन्याय अत्याचार होत असताना आरोपींवर कोणतीही कारवाई केली जात नाही. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता चिवसेना, जीवघेणारी व मागासवर्गीयांवर अन्याय करणारी सेना झाली आहे, अशी टीका भाजपच्या अनुसूचित मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केली.

‘महाविकास आघाडी सरकारचे फसवणुकीची दोन वर्ष’ या मालिकेअंतर्गत पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित  पत्रकार परिषदेत भालेराव बोलत होते. प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे, मयूर कांबळे, कोमल शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

भालेराव म्हणाले, ‘महावसुली ठाकरे सरकारच्या काळात अनुसूचित जाती जमातीवरील अन्याय वाढले आहेत.

हेही वाचा: सत्राच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा

दलित समाजातील अल्पवयीन मुली, महिला यांच्यावर अत्याचार होत आहेत, मारहाण केली जात आहे. पण त्यातील आरोपींवर कारवाई होत नाही. सर्वोच्‍च न्यायालयाने पदोन्नतीतीली आरक्षणावर बंदी आणल्यानंतर त्याचा लाभ पुन्हा मिळावा यासाठी सरकारने कोणताही पाठपुरावा केलेला नाही, त्यामुळे मागासवर्गीय जातीतील अधिकारी लाभापासून वंचित आहेत. अनुसूचित जाती जमातीची महात्मा फुले विकास मंडळ, अण्णा भाऊ विकास महामंडळ यासह इतर संस्थांना निधी दिला जात नसल्याने समाजातील लोकांना व्यवसाय, उद्योग करता येत नाही. हे सरकार केवळ शाहू फुले, आंबेडकर यांचे नाव घेण्यापुरते आहे. यांची राज्यात हुकूमशाही सुरू आहे.

केंद्र सरकारने उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत पाच पट वाढ करून ४००कोटी रुपयांचा निधी दिला, पण राज्य सरकारने त्यांच्या हिश्‍श्‍याचा ४० टक्के निधी अजून दिलेला नाही, त्यामुळे दलित विद्यार्थी शिक्षणासापासून वंचित राहात आहेत. सामाजिक न्याय खाते पवित्र आहेत, पण या खात्याचे मंत्री काय करत असतात हे राज्याला माहिती आहे. अनेक योजनांमध्ये त्रुटी दाखवून मदत नाकारली जात आहे. मागासवर्गीयांचा निधी वळवला जात असल्याची टीका भालेराव यांनी केली. मागासवर्गीय मंत्री देखील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून खोटे बोलून केवळ खुर्चीला चिटकून बसले आहेत, अशी टीका भालेराव यांनी केली.

loading image
go to top