"भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार"; शिवसेनेच्या 54 व्या वर्धापनदिनी उध्दव ठाकरेंचा निर्धार.. 

udhhav thackeray
udhhav thackeray

मुंबई: विश्‍वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही,संस्कृती आहे."प्राण जाय पर वचन ना जाये ही आपली संस्कृती आहे',पण आपल्या सोबत राजकरण करण्याचा प्रयत्न झाला. ते राजकरण मोडीत काढल्यामुळे मी आज मुख्यमंत्री झालो.  शिवसैनिक सोबत असेपर्यंत मला कुणाची भिती नाही. भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार.असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.

लाचार होणार नाही: 

शिवसेनेच्या 54 व्या वर्धापन दिना निमीत्त उध्दव ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फिरसिंगच्या माध्यामातून राज्यभरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधीत केले.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले,"अन्याया विरोधात लढण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. शिवसेना प्रमुखांची तीच परंपरा मी घेऊन जात आहे. शिवसेनेने विचार धारा बदलेली नाही.पण, शिवसेना कुणापुढं लाचरही होणार नाही", या शब्दात त्यांनी शिवसेना भाजपमध्ये झालेल्या राजकरणावर भाष्य केले.

शिवसेना हेच वादळ:

"शिवसैनिक प्रत्येक संकटात जात आहेत. चक्रीवादळ, कोरोनाचे संकट शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी उभा आहे. शिवसेनेच्या शाखा आता दवाखाने झाल्या आहेत. डॉक्‍टरांना सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. जिवाची पर्वा न करता शिवसैनिक झटत आहेत. शिवसैनिक कधिही संकटाला डगमगणारा नाही. शिवसैनिक सोबत असे पर्यंत मला कोणाचीही भीती नाही. शिवसेना हेच वादळ आहे. त्यामुळे आम्हाला इतर वादळांची पर्वा नाही.असेही त्यांनी सांगितले.

शिवसैनिकांना भावनिक साद:

या वेळी ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक सादही घातली. "शिवसैनिक हे माझ्या भोवतीचं कवच आहे,असे शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. हे कवचही आहे त्यांचा वचकही आहे. याच शिवसैनिकांच्या प्रेमाचा ओलावा माझ्या अंगावर आहे. मुख्यमंत्री झाल्यामुळे संपर्क कमी झाला असला तरी मी नात्यात अंतर पडू देणार नाही",असा विश्‍वास देत ठाकरे यांनी शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतानाच काळजी घेण्याचेही आवाहन केले. शिवसेना लाचार होणार नाही,तुमच्या शिवसेनाप्रमुखही लाचार होणार नाही असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

ही तर शिवनेरीच्या मातीची कमाल: 

"शिवनेरी,एकविरेला दर्शनाला गेलो.शिवनेरीची माती घेऊन राम जन्मभुमीला गेलो आणि एक वर्षात राम मंदिरचा निकाल आला.आपल्याकडे मुख्यमंत्री पद आल.शिवनेरीच्या मातीची ही कमाल आहे".

देशातील प्रत्येक राज्यात शाखा:

गाव तेथे शाखा हा कार्यक्रम हाती घ्यायचा आहे. प्रथम असा कार्यक्रम आपण हाती घेतला होता. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील प्रत्येक राज्यात आपली शिवसेनेची शाखा असायला पाहिजे. त्या शाखेचा आवाज बुलंद करायचा प्रयत्न आहे. शिवसेना ही 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकरण करत होती. मात्र,सत्तेत आल्या पासून अपाण 100 टक्के समाजकरण केले आहे, दिलेली वचने पुर्ण करण्यास सुरवात केली आहे,"असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी नमुद केले.

shivsena foundation day udhhav thackeray addressed shivsainik 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com