सूर्यग्रहणानंतर कोरोनाचा प्रभाव खरंच कमी होणार? जाणून घ्या काय म्हणतायत खगोल अभ्यासक..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

येत्या 21 जून रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणानंतर कोरोनाचा प्रभाव कमी होणार किंवा कोरोना संपणार असे वृत्त समाज माध्यमातून व्हायरल होत आहे.

मुंबई: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणानंतर कोरोनाचा प्रभाव कमी होणार किंवा कोरोना संपणार असे वृत्त समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. कोरोना आणि सूर्यग्रहणाचा काही संबंध नसून सूर्यग्रहण हा नैसर्गिक आविष्कार आहे असे स्पष्टपणे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. 

येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. सूर्यग्रहणानंतर कोरोना नष्ट होईल, हा चुकीचा समज आहे.  26 डिसेंबरला चीननमध्ये कंकणाकृती ग्रहण झाले होते पण तिथे कुठलाही कोरोना नष्ट झाला नाही, त्यामुळे या वृत्तात काहीच तथ्य नसल्याचे सोमण यांनी सांगितले. सूर्यग्रहण हा नैसर्गिक आविष्कार असून याचा कोरोनाशी काही संबंध नाही. लोकांनी करोना विषयी काळजी घ्यावी असे आवाहनही दा. कृ. सोमण यांनी केले.

मोठी बातमी : ...म्हणून सुशांत होता प्रचंड तणावात ? तीन दिवसांपूर्वीच नोकरांना म्हणाला....

21 जून 2020 रोजी कंकणाकृती सूर्य ग्रहण होणार आहे.   भारतात ग्रहणाची सुरवात सकाळी 9.58 वा भूज इथे खंडग्रास ग्रहणाने होईल व डिब्रुगड येथे दुपारी 2.29 मिनिटाने समाप्त होईल.

कंकणाकृती ग्रहणाची सुरुवात भारताच्या पश्चिमेस घेरसाणा या शहरात 11.50 ला होईल आणी ते सुमारे 30 सेकंद दिसेल. कंकणाकृती ग्रहणाच्या पट्यावर दिल्लीच्या उत्तरेतील कुरूक्षेत्र आणि देहारादून  ही प्रमुख शहरें आहेत. उत्तराखंण्डातील कलंक शिखरावर सर्वात शेवटी कंकणाकृती ग्रहण दिसेल. ते होईल 12.10 वा आणि सुमारे 28 सेकंदांसाठी सूर्य कंकण दिसेल. मुंबईत सकाळी 10 ते 11.37 यावेळेस ग्रहण दिसेल. 

या पूर्वीची कंकणाकृती ग्रहणे भारतात 15 जानेवारी 2010 आणि 26 डिसेंबर 2019 रोजी झाली होती.या नंतर भारतातून दिसणारे ग्रहण सुमारे 28 महिन्यांनी 25 ऑक्टोबर 2020रोजी असेल. पण तेव्हा फक्त भारताच्या पश्चिम भागातूनच हे दिसेलअशी माहिती नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनि दिली.

ग्रहण बघण्याचे सुरक्षित उपाय:

-- ग्रहण बघण्यासाठीचे गॉगल वापरा.
-- ग्रहण बघण्यासाठी फक्त शास्त्रीय पद्धतीने बनवलेल्या गॉगलचाच उपयोग करा. 
-- वेल्डीग करणाऱ्यांचे फिल्टर वापरा. 
-- असे फिल्टर तुम्हाला हार्डवेयरच्या दुकानात मिळू शकतील. 13 किंवा 14 नंबरचे फिल्टर वापरा.

 पिन होलचा वापर:

कागदावर एक बारीक छित्र पाडून आपल्याला दुसर्‍या एका पांढर्‍या कागदावर सूर्याची प्रतिमा  निर्माण करता येत. तसेच हा कागद तुम्ही एका आरशाच्या काचे वर लावून सूर्याची प्रतिमा दूर वर निर्माण करू शकता.  असा आरसा  तुम्हाला मेकअप किटमधे मिळू शकतो.

हेही वाचा: मुंबईकरांनो SBI बँकेसंबंधातील ही अत्यंत महत्त्वाची बातमी आधी वाचा, कारण २१ तारखेला....

 हे मात्र अजिबात करू नका:

-- कधी ही सूर्याकडे नुसत्या डोळ्यांनी बघू नका. सूर्य प्रकाश खूप प्रखर आहे. त्यामुळे तुमच्या दृष्टी पटलाला कायमची इजा होण्याची संभावना आहे.

-- सूर्याचे प्रतिबिंब पाण्यातून कधीही बघू नये. तसेच काचेवर काजळी धरून त्यातून सूर्याकडे बघू नये. काचातून जरी दृश्य प्रकाशाची तीव्रता कमी होत असली तरी त्यातून अधोरक्त किरणे जाऊ शकतात जे आपल्या डोळ्यांना अपायकारक असू शकतात.

-- सध्या देशावर करोनाचे संकट आहे लक्षात ठेवून आणि पूर्ण खबरदारी घेऊनच तुम्ही ग्रहण दर्शन करा.

truth behind corona effect will be less after solar eclipse 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: truth behind corona effect will be less after solar eclipse