सामनाच्या फ्रंट पेजवरील सूचक जाहिरात म्हणतेय, "हे ज्यांनी केले, त्यांचा मला अभिमान आहे !"

सुमित बागुल
Wednesday, 5 August 2020

आज सामनाच्या पहिल्या पानावर जी जाहिरात पाहायला मिळतेय, ती जाहिरात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी दिली आहे

मुंबई : आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत भव्य राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडतोय. या सोहळ्यानिमित्त देशभरात आनंदाचं वातावरण आहे. शिवसेनेचा राम मंदिरासाठीच्या लढ्यात आणि एकंदरच राम मंदिर उभारण्यात मोलाचा वाटा राहिलाय. या पार्श्वभूमीवर सामनामधून राम मंदिराच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय. सामना म्हणजे शिवसेनेचं मुखपत्र, यामध्ये पहिल्या पानावर एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत "हे ज्यांनी केले, त्यांचा मला अभिमान आहे" असं नमूद करण्यात आलंय

मिलिंद नार्वेकरांनी दिली आहे जाहिरात : 

आज सामनाच्या पहिल्या पानावर जी जाहिरात पाहायला मिळतेय, ती जाहिरात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी दिली आहे. यावर "हे ज्यांनी केले, त्यांचा मला अभिमान आहे" असे शब्द लिहिले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या जाहिरातीत बाबरी विद्धवंसाचा फोटो देखील वापरण्यात आला आहे. या जाहिरातीत मुख्यत्त्वे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसोबत स्वतः मिलिंद नार्वेकर यांचाही फोटो पाहायला मिळतो. अयोध्येतील निर्माणाधीन भव्य राम मंदिरासाठी शिवसेनेनं घेतलेल्या निर्णयांना आणि आठवणींना उजाळा देण्यासाठी ही जाहिरात असल्याचं बोललं जातंय.  

मोठी बातमी - नौदलाच्या धैर्याचं प्रतीक म्हणजे जहाजांचा 'अँकर', जहाजांच्या अँकरबद्दल रंजक माहिती...

जिथे श्रीराम हे कौटुंबिक राजकारण व अंतर्विरोधाचे बळी ठरले, तिथे इतर पामरांचे काय?  

जिथे श्रीराम हे कौटुंबिक राजकारण व अंतर्विरोधाचे बळी ठरले, तिथे इतर पामरांचे काय? असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र सामनातून आजच्या भूमिपूजन सोहळ्यावर भाष्य करण्यात आलं आहे. राम मंदिर प्रकरण निकाली काढणारे न्या. रंजन गोगोई यांनी देशातील तीन दशकं प्रलंबित खटल्याची सुनावणी केली. रंजन गोगोई यांनी रामाला त्या गुंत्यातून बाहेर काढले आणि स्पष्ट निकाल राम मंदिराच्या बाजूने दिला. त्या रंजन गोगोई यांचं नाव निमंत्रितांमध्ये न दिसल्याची खंत आजच्या सामनातून बोलून दाखवण्यता आली आहे. आजच्या कार्यक्रमात रंजन गोगोई नाहीत आणि बाबरीची घुमटे पायापासून उद्ध्वस्त करणारी शिवसेनाही नाही असंही म्हटलंय. गोगोई विशेष निमंत्रितांत कुठेतरी दिसायलाच हवे होते असं सामनात म्हटलंय. 

shivsena front page advertisement speaks about ram mandir and balasaheb thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena front page advertisement speaks about ram mandir and balasaheb thackeray