esakal | मातोश्रीची मर्जी राखण्यात प्रियांका चतुर्वेदी यशस्वी, मिळाली राज्यसभेची उमेदवारी...
sakal

बोलून बातमी शोधा

मातोश्रीची मर्जी राखण्यात प्रियांका चतुर्वेदी यशस्वी, मिळाली राज्यसभेची उमेदवारी...

मातोश्रीची मर्जी राखण्यात प्रियांका चतुर्वेदी यशस्वी, मिळाली राज्यसभेची उमेदवारी...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल झालेल्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर पक्षाकडून नेमकी काय जबाबदारी दिली जाते याची कायमच चर्चा होती. राज्यसभेसाठी शिवसेनेकडून दिवाकर रावते आणि चंद्रकांत खैरे यांची नावं चर्चेत होती. अशात आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलीये. शिवसेनेने आपल्या राज्यसभेच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलंय, त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातील राज्यसभेची उमेदवारी प्रियांका चतुर्वेदी यांना दिली गेलीये. त्यामुळे मातोश्रीची मर्जी राखण्यात प्रियांका चतुर्वेदी यशस्वी झाल्यात. 

मोठी बातमी - मन सुन्न करणारी घटना : ...म्हणून मित्रांनी त्याची पॅन्ट खाली ओढून त्याचं गुप्तांग

विधानसभा निवडणुकांदरम्यान प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत दाखल झाल्यात.  विधानसभा निवडणुकांदरम्यान प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनेकडून सक्रिय प्रचार देखील केला. आदित्य ठाकरे यांच्यासाठी देखील प्रियांका चतुर्वेदी यांनी जोरदार कॅम्पेनिंग केलं होतं. शिवसेनेकडून राष्ट्रीय पातळीवरील चेहरा म्हणून प्रियांका चतुर्वेदी यांच्याकडे पाहिलं जातंय. प्रियांका चतुर्वेदी यांचं इतर पक्षांमध्ये चांगलं नेटवर्किंग देखील आहे. चतुर्वेदी यांचं मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांवर प्रभुत्व आहे. शिवसेनेची बाजू राष्ट्रीय पातळीवर ठामपणे मांडण्यासाठी प्रियांका चतुर्वेदी याना उमेदवारी दिलं गेल्याचं राजकीय विश्लेषकांचे म्हणणं आहे. शिवसेनेच्या यंग ब्रिगेडमधील एक प्रमुख चेहरा म्हणूनही प्रियांका चतुर्वेदी यांच्याकडे पाहिलं जातंय.  

मोठी बातमी - "दारूने घसा गरम राहतो; दारूचे घोट घ्या, कोरोनापासून दूर राहा" काय आहे सत्य/असत्य

प्रियांका चतुर्वेदी यांना काँग्रेसकडून मथुरा किंवा मुंबईतून उमेदवारीची अपेक्षा होती.  मात्र प्रियांका चतुर्वेदी यांचा अपेक्षाभंग झाला होता आणि त्या शिवसेनेत दाखल झाल्यात. लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला मोठा धक्का देत तत्कालीन काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेत दाखल झालेल्या. यादरम्यान प्रियंका चतुर्वेदी यांनी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना पक्षात प्राधान्य दिले जाते, असे म्हणत नाराजी देखील व्यक्त केली होती. याबद्दल त्यांनी एक ट्विट देखील केलं होतं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना काँग्रेसमधील नाराजी समोर आली होती. यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला होता. 

shivsena gives rajyasabha ticket to priyanka chaturvedi who is close to aaditya thackeray