esakal | "दारूने घसा गरम राहतो; दारूचे घोट घ्या, कोरोनापासून दूर राहा" काय आहे सत्य/असत्य
sakal

बोलून बातमी शोधा

"दारूने घसा गरम राहतो; दारूचे घोट घ्या, कोरोनापासून दूर राहा" काय आहे सत्य/असत्य

"दारूने घसा गरम राहतो; दारूचे घोट घ्या, कोरोनापासून दूर राहा" काय आहे सत्य/असत्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. जगभरात कोरोनामुळे एकूण  ४००० पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. आता महाराष्ट्रातही कोरोनाचे ११ रुग्ण आढळले आहेत. जगभरात गंभीर परिस्थिती आहे, अशात सोशल मीडियावर अफवांचं पिक जोरात आहे. कोरोनाबाबत जगभरात निरनिराळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. 

WhatsApp , Facebook च्या माध्यमातून काही लोकं कोरोनाबद्दलचे चुकीचे मेसेज पसरवत आहेत.  कोरोनापासून आपला कसा बचाव करायला हवा याची चुकीची आणि कोणतंही तथ्य नसलेली माहिती पसरवली जातेय. यातील ९९ टक्के मेसेजेस केवळ अफवा असल्याचं समोर आलंय. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असं प्रशासनकडून सतत सांगण्यात येतंय. तरीही अफवांचं प्रमाण कमी होत नाहीये.  

हेही वाचा: भारतीय महिलांना एकट्याने 'हे' करायला आवडतं.... 

'दारू पिण्याने कोरोना होत नाही' असा एक मॅसेज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मॅसेजमध्ये दारूचा फायदा सांगण्यात आला होता. मग काय, हा मेसेज बघताच जगभरात लाखो लोकांनी याला चटकन फॉरवर्ड केलं. असे अनेक मॅसेज अध्या वाऱ्यासारखे जगभरात पसरलेत. दारू पिणाऱ्यांसाठी ही पर्वणीच ठरली. 'दारू प्या आणि कोरोना घालवा' असं म्हणत काही लोकांनी तर 'दो घुंट जिंदगी के' असं म्हणत दारूचं सेवन करण्याची सुरुवात केली होती. काही लोकं तर इतरांना दारूचे फायदे समजावून सांगायला लागले.  

हेही वाचा: गणेश नाईकांच्या बॅनरवर झळकले शिवसेनेचे नगरसेवक: इथं काय शिजतंय ?

मात्र आता या व्हायरल झालेल्या मेसेजवर जागतिक आरोग्य संघटनेनं खुलासा केला आहे. अशा प्रकारच्या अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संस्थेनं केलं आहे. दारू प्यायल्यानं कोरोना व्हायरस दूर होतो ही केवळ अफवा आहे. त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कोरोनाचा संसर्ग एकदा झाला की तुम्ही मद्यपान केलं तरीही तो व्हायरस मारला जाऊ शकत नाही. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीच्या अंगावर मद्य शिंपडणं, मद्यपान करणं किंवा मद्य देणं हे शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे अशा कोणत्याही मेसेजेसवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलंय. 

 Drink alcohol and avoid corona know truth behind this viral message