"शिवसेनेने साथ सोडली तरीही भाजपा हिंदूंच्या पाठीशी आहे" | Atul Bhatkhalkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atul Bhatkhalkar

"शिवसेनेने साथ सोडली तरीही भाजपा हिंदूंच्या पाठीशी आहे"

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : मुख्यमंत्री व शिवसेनेने (shivsena) सत्तेच्या लालसेपोटी हिंदूची (Hindu people) साथ सोडली असली तरीही भाजपा (bjp) हिंदूंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. यापुढे हिंदूंवरील भ्याड हल्ले सहन केले जाणार नाहीत, असा इशारा भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी आज येथे दिला. नांदेड, अमरावती, मालेगाव येथील धार्मिक दंगलींच्या (Religious riots) निषेधार्थ व यासंदर्भात हिंदूंच्या भावना राज्य सरकार (mva government) पर्यंत पोहोचाव्यात याकरिता मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे धरण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा: आर्यन खान प्रकरणात NCBचं थोबाड फुटलंय!

त्रिपुरा येथील अफवेचा आधार घेत नांदेड, अमरावती, मालेगाव येथे हिंसक धार्मिक दंगली घडवून पोलिस-हिंदुवर जीवघेणे हल्ले करण्यात आले. त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून ठाकरे सरकारने, स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या सर्वसामान्य हिंदूंवर खोटे गुन्हे दाखल केले असा आरोप भातखळकर यांनी केला.

महाराष्ट्रात नेहमीच धार्मिक दंगल घडविणाऱ्या व या दंगलीत सुद्धा हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घालावी. ही दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना तात्काळ अटक करावी स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई तात्काळ बंद करावी. त्यांच्यावरील तसेच भाजप कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, भाजपा नेते आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अमित साटम, मनीषा चौधरी, पराग अळवणी, सुनील राणे, मिहिर कोटेचा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.

loading image
go to top