Yakub Memon: गोडसेची जयंती करणारे याकुब मेमनबद्दल बोलतायत; सुषमा अंधारे भडकल्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yakub Memon
Yakub Memon: गोडसेची जयंती करणारे याकुब मेमनबद्दल बोलतायत; सुषमा अंधारे भडकल्या!

Yakub Memon: गोडसेची जयंती करणारे याकुब मेमनबद्दल बोलतायत; सुषमा अंधारे भडकल्या!

दहशतवादी याकुब मेमन याच्या कबरीचा वाद आता चांगलाच चिघळताना दिसत आहे. त्यावर राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा खेळ रंगला आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी यावरुनच भाजपावर जोरदार टीका केली आहे. तसंच गांधीजींचा खुनी नथुराम गोडसे याचं समर्थन करण्यावरुन भाजपाला सुनावलं आहे.

हेही वाचा: Yakub Memon: मेमनच्या कबरीची सजावट; रक्तपात घडवणाऱ्याचं उदात्तीकरण?

याकुब मेमन याच्या कबरीला सजावट करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावरुन आता राज्यात मोठा वाद पेटला आहे. याबद्दल बोलताना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, याकुब मेमनची फाशी आणि त्यानंतरची अंमलबजावणी भाजपाच्या काळात झाली. अमेरिकन सरकार जर ओसामा बिन लादेनचा मृतदेह समुद्रात टाकतं, तर अशी एखादी कृती त्याच काळात तुम्हाला का सुचली नाही? मुळात तुम्ही प्रेत दफन करण्याची परवानगी का दिली होती.

हेही वाचा: Yakub Memon: याकुब मेमन कबर सजावटीवरुन भाजपा आक्रमक; "उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी..."

नथुराम गोडसेच्या समर्थनावरुन अंधारे यांनी भाजपाला चांगलंच सुनावलं आहे. त्या म्हणाल्या की, "जेव्हा याकुब मेमनच्या कबरीच्या फुलांवरुन चर्चा करतात, तेव्हा हे सगळे नकली हिंदुत्ववादी, त्यांना या गोष्टीचा विसर पडतोय का की या देशातला ७३ वर्षांपूर्वीचा सगळ्या पहिला दहशतवादी नथुराम गोडसे, ज्याचे रक्तरंजित कपडे, ज्यावर कदाचित गांधीजींचंही रक्त असेल, ते कपडे आजही जपून ठेवले जाता, त्याच्या अस्थी जपून ठेवल्या जातात. आणि त्याच्या स्मरणार्थ पुन्हा एकदा गांधीच्या फोटोला गोळ्या घातल्या जातात, हे हिंदुत्व आहे तुमचं? याकुब मेमनच्या कबरीचं काय करायचं ते केलंच पाहिजे, त्याचं समर्थन कोणी करणारच नाही., त्याची चौकशीसुद्धा व्हायला हवी. पण नथुराम गोडसेंची जयंती करणाऱ्यांचं काय करायचं, हा प्रश्न तमाम संघी आणि भाजपाच्या लोकांना विचारायची गरजआहे".

Web Title: Shivsena Leader Sushma Andhare On Yakub Memon Grave Decoration Nathuram Godse Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Shiv Sena