शिवसेनेचे आमदार हनी ट्रॅप मध्ये; पैसे उकळणाऱ्या आरोपीला अटक | Mangesh kudalkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mangesh kudalkar

शिवसेनेचे आमदार हनीट्रॅप मध्ये; पैसे उकळणाऱ्या आरोपीला अटक

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेचे (shivsena) कुर्ला-नेहरुनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh kudalkar) यांना हनीट्रॅप (honeytrap) करुन पैसे उकळण्याचा (money fraud) प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला मुंबईच्या सायबर पोलिसांनी (Mumbai cyber police) अटक केलीय. मोसमदिन दिन महोम्मद खान असं अटक केलेल्या आरोपीचं (culprit arrested) नाव आहे.

हेही वाचा: घराचं आमिष दाखवून मुंबईतल्या १६ जणांना कोट्यवधींचा गंडा; पती-पत्नीवर गुन्हा

मोसमदिन खाननं आधी फेसबुकवर महिलेचं प्रोफाईल बनवून मदत हवी असल्याचं कारण संगत कुडाळकर यांच्याशी ओळख करुन घेतली, त्यानंतर त्यांना व्हॉटस अॅप नंबरवरुनही मदतीसाठी संपर्क केला, व्हॉटसअपवर बोलता बोलता त्यांना व्हिडीओ कॉल घ्यायला भाग पाडलं, आणि तो व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करुन तो मॉर्फ केला, त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. त्यानंतर मंगेश कुडाळकर यांनी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली.

मुंबईच्या पश्चिम विभाग सायबर पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सविता शिंदे, पोलीस उपनिरीक्षक राहुल खेत्री यांनी तपास करत आरोपी हा राजस्थानचा असल्याचं शोधून काढलं, त्यानंतर पोलीसांची टीम पाठवून स्थानिक पोलीसांच्या मदतीनंं तीन दिवसात राजस्थानातल्या भरतपूर इथुन आरोपीला अटक केली. त्याच्या आणखी दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपीच्या विराधात भा द वि च्या कलम 384, 500, 34 सह माहीती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(क), 66(ड) आणि 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीनं अशा प्रकारे आणखीही काही लोकांनी फसवलं असल्याचं तपासात पुढे आलंय.

loading image
go to top