esakal | 16-14-12 असा असेल महाराष्ट्रातील पद वाटपाचा फॉर्म्युला ?
sakal

बोलून बातमी शोधा

16-14-12 असा असेल महाराष्ट्रातील पद वाटपाचा फॉर्म्युला ?
  • नव्या मैत्रीचा शिवसेनेला फायदा ?
  • शिवसेनेला ५ वर्ष मिळणार मुख्यमंत्रिपद ?
  • मुख्यमंत्रिपदासह १६ खातीही शिवसेनेच्या वाट्याला ?

16-14-12 असा असेल महाराष्ट्रातील पद वाटपाचा फॉर्म्युला ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यात निकाल आलेत. निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय पेच. कोण सरकार स्थापन करणार याबाबतची कुतूहलता देखील महाराष्ट्राने अनुभवली. अशात आता महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्रित येत महाराष्ट्रात सत्ता स्थापन लवकरच सत्ता स्थापन करणार आहेत.  महाशिवआघाडीत शिवसेना  राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे तीन पक्ष आहेत. मात्र ही नवीन मैत्री कुणासाठी सर्वात जास्त फायदेशीर ठरेल याबाबत आता सर्वांच्या मनात कुतूहल आहे 

भाजपला वगळून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा करणाऱ्या शिवसेनेला नवी मैत्री फायदेशीर ठरणार असल्याचंच दिसतंय. कारण काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेत सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. नव्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. तर, अन्य महत्त्वाच्या पदांचं वाटप समसमान होणार आहे. 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदानंतर उरलेल्या खात्यांचं वाटप 16-14 -12 असं होणार आहे. शिवसेनेला १६, राष्ट्रवादी काँग्रेसला १४ तर काँग्रेसला १२ मंत्रिपदं मिळणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महत्त्वाच्या खात्यांपैकी गृहखातं राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदासह महसूल हे खातं काँग्रेसला मिळणार आहे. अर्थ आणि नगरविकास खातं शिवसेनेकडं राहणार आहे.

एकंदरीतच भाजपकडे अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरणाऱ्या शिवसेनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करणं लॉटरी असल्याचं मानलं जातेय.

WebTitle : shivsena may get CM post for all five years

loading image