महाविकास आघाडीत बिघाडी! रायगडचे पालकमंत्री बदलण्याची शिवसेनेची मागणी

Shivsena MLA bharat gogawale
Shivsena MLA bharat gogawalesakal media

माणगाव : पालकमंत्री पदावरून (Guardian minister) रायगडच्या जिल्ह्यात महाविकास आघाडीत (mva government) बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालकमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) मनमानी कारभार करत असल्याची तक्रार करत जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री द्यावा, अशी मागणी महाडचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी ‘मातोश्री’कडे केली आहे. दरम्यान, नगरपंचायत निवडणुकीवेळी झालेला शिवसेना-राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमधील (shivsena-ncp dispute) संघर्ष आता पालकमंत्री पदावरून पुन्हा उफाळण्याची शक्‍यता आहे.

Shivsena MLA bharat gogawale
पनवेल महापालिकेच्या नोटीसांची केली होळी; आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल

रायगडसाठी शिवसेनेचा पालकमंत्री हवा, अशी मागणी आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यासाठी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हेदेखील आपल्यासोबत असल्याचा दावा गोगावले यांनी केला आहे. शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी एकत्र येत विद्यमान पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. गोगावले यांनी आज माणगाव येथे पत्रकार परिषदेत तटकरे यांना पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी केली.

नगरपंचायतीपासून वादाला सुरुवात

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीवेळी शिवसेनेने भाजपची मदत घेतली. त्यामुळे शिवसेनेने महाविकास आघाडीला सुरुंग लावला. त्यामुळे आगामी सर्वच निवडणुकीत शिवसेनेचा वचपा काढा, असे जाहीर आदेश खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले. त्यावर शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेतली असून आमदार गोगावले यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. अदिती तटकरे या मनमानी कारभार करत असून घटक पक्ष म्हणून त्या शिवसेनेला विश्‍वासात घेत नाहीत, असा आरोप गोगावले यांनी केला. त्यामुळे या वादाचे पडसाद आता आगामी निवडणुकांमध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com