'शिवसेनेचे आमदार फोडायचा प्रयत्न केला तर डोकं फोडू'

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

'शिवसेनेला आमदार फुटण्याची भिती नाही, पण कोणी आमदार फोडायचा प्रयत्न केला, तर आम्ही त्याचं डोकं फोडू' असा इशारा शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी दिला आहे. 

मुंबई : सध्या कोणता पक्ष कोणाला पाठिंबा देईल आणि कोण बहुमत सिद्ध करेल याचा काही नेम नाही. अशात आमदार फोडाफोडीचं राजकारण आलंच... याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे एक आमदार आक्रमक झाले आहेत. 'शिवसेनेला आमदार फुटण्याची भिती नाही, पण कोणी आमदार फोडायचा प्रयत्न केला, तर आम्ही त्याचं डोकं फोडू' असा इशारा शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी दिला आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

दिलीप लांडे हे मुंबईच्या चांदिवलीतील शिवसेनेचा आमदार आहेत. 'शिवसेनेचा कोणता आमदार फुटेल अशी उद्धव ठाकरेंना भिती नाही. त्यांचा सर्व आमदारांवर पूर्ण विश्वास आहे, तसेच सर्व आमदारांचा शिवसेना व उद्धवजींवर विश्वास आहे. आपल्या आमदारांना फोडायचा कोणी विचार केला, तर त्याचंच डोकं फुटेल, अशी उद्धवजींना खात्री आहे,' असे लांडे यांनी सांगितले. 

बच्चू कडू ताब्यात; राष्ट्रपती राजवटीत मोर्चाला परवानगी नाही?

गेले काही दिवस शिवसेनेचे सर्व आमदार 'द रिट्रीट' या हॉटेलमध्ये होते. सत्तास्थापन करण्याची संधी मिळाल्यास सर्व आमदारांना मुंबईत येण्यास गडबड होऊ नये, यासाठी सर्व आमदारांना एकत्रितपणे हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती. तसेच आता उद्धव ठाकरे यांनी सर्व मतदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन मतदारांच्या संपर्कात राहण्याचे आदेश दिले आहेत. 

बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, हे ठरलं होतं : संजय राऊत

'शिवसेनेची विचारधारा ही शेतकऱ्याच्या हितासाठी आहे. उद्धव ठाकरेंनी सत्ता, खुर्ची बाजूला ठेवली आणि ज्या शिवसैनिकांनी, शेतकऱ्यांनी त्यांना मदत करण्याचं कर्तव्य बजावलं' असंही लांडे म्हणाले. दिलीप लांडे यांनी काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांचा पराभव केला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MLA Dilip Lande gets angry