शिवसेना आमदारांना पाच दिवसाचे कपडे, आधार आणि पॅनकार्ड घेऊन येण्याचे आदेश

शिवसेना आमदारांना पाच दिवसाचे कपडे, आधार आणि पॅनकार्ड घेऊन येण्याचे आदेश
Updated on

राज्यातील सत्तापेच आणि राष्ट्रपती राजवटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी शिवसेना आमदारांची मुंबईत बैठक बोलावलीय. या बैठकीला हजर राहण्याचे आदेश सर्व आमदारांना देण्यात आले आहेत. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: मार्गदर्शन करणार आहेत. सर्व आमदारांना येताना पाच दिवसाचे कपडे, आधार आणि पॅनकार्ड घेऊन येण्याचे आदेशही देण्यात आलेयत. यावेळी राज्यातील सत्तापेचावर चर्चा होणार असल्यानं या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलंय. शुक्रवार २२ नोव्हेंबरला मातोश्रीवर दुपारी 12 वाजता ही बैठक होणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय

राऊत आणि पवार यांच्यात दहा मिनिटांची भेट

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. अवघ्या दहा मिनिटाच्या या भेटीत महत्त्वाच्या विषयावर खलबतं झाल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उद्याच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जातेय

सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता

राज्यातला सत्तास्थापनेचा तिढा येत्या एक ते दोन दिवसात सुटण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत एक ते दोन दिवसात महाशिवआघाडी संदर्भात निर्णय होईल. दिल्लीत उद्या होणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत महाशिवआघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर  शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार नाहीत असं देखील समजतंय.  

Webtitle : shivsena MLAs asked to carry five days cloths pan and aadhar card

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com