नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मूलभूत सोयीसुविधा देण्यात मध्ये रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने खासदार नरेश म्हस्के यांनी मध्ये रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची आज भेट घेतली. वेळीच कामे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.