BMCच्या सफाई कामगारांना कायमस्वरूपी घरे द्या- खासदाराची मागणी

BMCच्या सफाई कामगारांना कायमस्वरूपी घरे द्या- खासदाराची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली मागणी Shivsena MP Rahul Shewale Letter to CM Uddhav Thackeray requesting Fixed Houses to BMC Cleaning Workers
BMCच्या सफाई कामगारांना कायमस्वरूपी घरे द्या- खासदाराची मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली मागणी

---------------------------------------------------

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगराच्या स्वच्छतेची जबाबदारी सुरळीतपणे पार पाडणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना घरकुल योजनेअंतर्गत कायमस्वरूपी घरे द्यावीत, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी या विषयीचे निवेदन दिले. खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई शहर आणि उपनगराच्या स्वच्छतेचे काम पालिकेचे सफाई कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये करतात. यासाठी त्यांची निवासस्थाने त्यांच्या विभागालगतच्या क्षेत्रांत असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी कायमस्वरूपी घरे द्यावीत. (Shivsena MP Rahul Shewale Letter to CM Uddhav Thackeray requesting Fixed Houses to BMC Cleaning Workers)

BMCच्या सफाई कामगारांना कायमस्वरूपी घरे द्या- खासदाराची मागणी
मुंबईत नायर रुग्णालयात बालकांवर क्लिनिकल चाचणी, एथिक कमिटीची परवानगी

सद्यस्थितीत, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजने'अंतर्गत, मुंबई शहर आणि उपनगरांमधील एकूण 46 वसाहतींमध्ये 5592 कामगारांना सेवानिवासस्थाने देण्यात आली आहेत. या वसाहती 1962 साली उभारण्यात आल्या असून त्यांतील निवासस्थाने केवळ 150 चौरस फुटांची आहेत. आयुष्याची 30-40 वर्षे पालिकेची चाकरी करूनही या कामगारांना मुंबईत स्वतःच्या हक्काचे घर घेता येत नाही. त्यामुळे सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना सदर निवासस्थान सोडावे लागते, अशी व्यथा त्यांनी मांडली.

MP Rahul Shewale Letter to CM
MP Rahul Shewale Letter to CM
BMCच्या सफाई कामगारांना कायमस्वरूपी घरे द्या- खासदाराची मागणी
"झोटिंग समितीचा अहवाल लपवण्यात आलाय"; काँग्रेसचा आरोप

अशा परिस्थितीत, पालिका कर्मचाऱ्यांना हक्काची घरं मिळवून देण्यासाठी पालिकेच्या जागांवर 'घरकुल' योजना राबविण्याची बाब शिवसेनेच्या वचननाम्यातही नमूद करण्यात आली होती. सध्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी आश्रय योजनेअंतर्गत कंत्रादाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया स्थायी समितीने पूर्ण केली आहे. त्यामुळे या आश्रय योजनेमध्येच 'घरकुल' योजनेचा अंतर्भाव करून पालिकेच्या सफाई कामगारांना कायमस्वरूपी घरे देऊन उर्वरित सदनिका सेवानिवासस्थाने म्हणून वापरता येतील, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी आपल्या निवेदनात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com