तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं, फिर भी... : संजय राऊत

टीम ईसकाळ
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दररोज ट्विट करायचा सपाटाच लावला आहे. दररोज सकाळी भाजपला टोला लगावणारे त्यांचे एक ट्विट पोस्ट झालेलेच असते. मुख्यमंत्रीपदावरून व जागावाटपावारून सेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच संजय राऊत रोज काही ना काही ट्विट करून चर्चेत येतच असतात. आजही त्यांनी कवी दुष्यंत कुमार यांच्या एका कवितेतील दोन ओळी ट्विट केल्या आहेत. 

भाजपचं ठरलं! शिवसेनेशिवाय करणार सत्तास्थापनेचा दावा 

संजय राऊत यांनी आज (ता. 7) सकाळी पुन्हा ट्विट केलंय. 'तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल है की, फ़िर भी तुम्हें यक़ीन नहीं' असे ट्विट राऊतांनी आज केलंय. यावर पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण विचारले असता, त्यांनी सांगितले की, दुष्यंत कुमार माझे आवडते कवी आहेत, त्यामुळे मी कविता पोस्ट करतो. 

शिवसेनेला भाजपच्या कर्नाटक पॅटर्नची धास्ती; आमदारांवर विशेष लक्ष

या ट्विटमधून पुन्हा एकदा त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. सत्तास्थापनेसाठी कोणीच जागांचा त्याग करायला तयार नाही. शिवसेना समसमान फॉर्म्यूलावर ठाम आहे. त्यामुळे निकालानंतर 14व्या दिवशीही सत्तास्थापनेची निश्चिती झालेली नाही. 

आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना फोडायची किंवा त्यांच्या आसपास फिरकायची कोणाची हिंमत नाही, असे सांगितले. 

काल (ता. 6) संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे सत्तासमीकरणे बदलणार का असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पण त्यानंतर शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करू. जनतेने सेना-भाजपला कौल दिला आहे, त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करावे. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut again tweets Dushyant Kumar poetry