अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला : संजय राऊत

वृत्तसंस्था
Saturday, 23 November 2019

'अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलं आहे. त्यामुळे जनता त्यांना माफ करणार नाही,' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबई : 'अजित पवार रात्रभर आमच्यासोबत होते, पण आमच्या नजरेशी नजर मिळवू शकले नाहीत. त्यांच्या मनात वाईट विचार होते म्हणूनच असं झालं. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलं आहे. त्यामुळे जनता त्यांना माफ करणार नाही,' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

भाजपने महाराष्ट्राच्या जनेतचा पैसा व जनतेच्या भावनांचा गैरवापर करून सत्तास्थापन केली. 'रात्रीच्या अंधारात वाईट कामे केली जातात,चोरी-डाका टाकला जातो, व्यभिचार होतो. यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ पण अंधारात घेतली. दिवसा-ढवळ्या शपथ का घेतली नाही,' असा सवाल राऊतांनी यावेळी केला. पवारांचा या सर्व घडामोडींशी काहीही संबंध नाही. त्यांना याबाबत काहीही माहीत नव्हते. अजित पवार रात्रभर आमच्यासोबत होते. ते अचानक निघून गेले, त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद होता. कोणत्या तरी वकिलाकडे जातोय असे त्यांनी सांगितले, आता कळले की ते कोणत्या वकिलाकडे गेले होते, असेही राऊतांनी यावेळी सांगितले. 

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

राजभवनात आज (शनिवार) राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र आल्याचे यावरून तरी दिसत आहे. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut criticizes Ajit Pawar in PC