माणूसकीला काळीमा!! मुंबईत रूग्णाला चक्क फूटपाथवर फेकलं...

धक्कादायक प्रकारानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून दोघांची हकालपट्टी
footpath
footpathFile-Photo
Summary

धक्कादायक प्रकारानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून दोघांची हकालपट्टी

मुंबई: कोरोना (Coronavirus) काळात रुग्णासाठी एकीकडे हॉस्पिटल प्रशासनाकडून प्राणाची बाजी लावली जात असताना दुसरीकडे एका वृद्ध रुग्णाच्या बाबतीत विचित्र प्रकार घडला. उपचार (Medical Treatment) न करता त्या रूग्णाला चक्क फुटपाथवर फेकून दिल्याचा धक्कादायक (Shocking) प्रकार समोर आला. परळ (Parel) येथील राजे एडवर्ड स्मारक (KEM Hospital) रुग्णालयात ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. एका व्यक्तीने याबाबतचा व्हिडीओ (Viral Video) प्रसारित केल्यानंतर या रुग्णाची व्यथा सर्वांसमोर आली. त्याची दखल घेऊन रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णाला पुन्हा रुग्णालयात दाखल करून घेतले. आणि यासाठी जबाबदार दोन कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली. (Shocking Mumbai Incidence 2 health workers abandon elderly patient on KEM Footpath)

footpath
"शिवसेनेचा संगत-गुण राष्ट्रवादीला लागला की काय..."

केईएम रुग्णालयात या अनोळखी रुग्णाला उपचारार्थ काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री 11 वाजता कक्ष क्रमांक 4-अ मधील निवासी डॉक्टरांच्या देखरेखीखाली असलेला हा रुग्ण पोटदुखीने त्रस्त झाल्याने त्यास शस्त्रक्रिया तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी नवीन इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या ESR मध्ये पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी दोन बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांना त्याच्यासोबत पाठविण्यात आले. मात्र या दोन कर्मचाऱ्यांनी त्याला शस्त्रक्रियेसाठी न नेता थेट फूटपाथवर आणून टाकले.

footpath
कोरोना रुग्णांचं होणार समुपदेशन; नायर रुग्णालयात हेल्पलाइन सुरू

केईएम हॉस्पिटलमध्ये रुग्णाला पदपथावर आणून सोडून दिल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमधून प्रसारित झाला. यामुळे पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली. हा रुग्ण प्रवेशद्वाराबाहेर कसा गेला, हे जाणून घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण पाहिले. त्यात आढळले की, या रुग्णाला शवागराच्या पॅसेजमधून प्रवेशद्वार क्रमांक 6 च्या बाहेर नेऊन तेथे सोडून देण्यात आले. यानंतर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्या दोन कंत्राटी बहुउद्देशीय आरोग्य कामगारांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांची रूग्णालय सेवेतून हकालपट्टी करण्यात आली.

footpath
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! तुम्ही वाचली का?

प्रकरण उघडकीस कसं आलं?

आपल्या नातेवाईकांच्या उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या एका नागरिकाने त्या वृद्ध रुग्णाला फूटपाथवर उघड्यावर सोडून दिल्याचे पाहिले. लागलीच त्याने ही घटना चित्रित करून सदर रुग्णाला रुग्णालयातील प्रवेशद्वार क्रमांक 6 बाहेर आणून सोडलं असल्याची बाब सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी तात्काळ या रुग्णास कक्ष क्रमांक 4-अ मध्ये पुन्हा दाखल करून त्याच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले. रुग्णालयात ही घटना घडल्याचे पालिका प्रशासनाने मान्य केले. मात्र रुग्णाच्या उपचारांमध्ये रुग्णालय प्रशासनाने कोणतीही हेळसांड केलेली नसल्याचेही म्हटले आहे. तसेच, त्या दोन कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केल्याचेही सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com