esakal | संजय राऊतांनी केलंय पुन्हा ट्विट! आजचे ट्विट वाचाच...

बोलून बातमी शोधा

Shivsena MP Sanjay Raut tweet on 22 November

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीचे व सत्तास्थापनेचे जवळपास ठरलेले असतानाच आज (ता. 22) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट करून भाजपला टोला लगावला आहे.

संजय राऊतांनी केलंय पुन्हा ट्विट! आजचे ट्विट वाचाच...
sakal_logo
By
टीम ईसकाळ

मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीचे व सत्तास्थापनेचे जवळपास ठरलेले असतानाच आज (ता. 22) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट करून भाजपला टोला लगावला आहे. दररोज राऊत काही ना काही सूचक ट्विट करून भाजपला चिमटा काढत असतात. आजही असेच हटके ट्विट राऊतांनी केलंय. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राऊत आज आपल्या ट्विटमधून असे म्हणतात की, 'कभी कभी कुछ रिश्तों से बाहर आ जाना ही अच्छा होता है| अहंकार के लिये नही.. स्वाभिमान के लिये!' त्यांच्या आजच्या ट्विटवरून भाजपवरची नाराजी थेट दिसून येते. काही नात्यातून बाहेर पडलेलेलच चांगले असते, अहंकारासाठी नाही, तर स्वाभिमानासाठी, असे राऊत म्हणतता. युतीच्या संबंधांवर त्यांनी ट्विटमधून थेटपणे भाष्य केले आहे. 

Video : उद्धव ठाकरे मध्यरात्री पवारांच्या भेटीला; कोण कोण पोहोचले?

काल (ता. 21) रात्रीच उद्धव ठाकरे काही महत्त्वाच्या नेत्यांसह शरद पवार यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊ भेटले. बऱ्याचवेळ चाललेल्या या चर्चेत नक्की काय निर्णय झाले, याबाबत अद्याप काही माहिती नाही. पण लवकरच महाविकासआघाडीची सत्तास्थापन होईल असे वक्तव्य राऊतांना कालच्या पत्रकार परिषदेत केले. डिसेंबर महिना सुरू व्हायच्या आत महाराष्ट्रात सत्तास्थापन होईल व मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.